आमरस पोळी

by Vaishali Chaudhari
0 views

आमरस पोळी


प्रस्तावना:::

उन्हाळा लागला की आमच्या सगळ्यांकडेच केला जातो.. आमरस करण्याच्या पद्धती खूप वेगवेगळ्या असतात… त्यातच आपण एक सोपी पद्धत अशी पाहणार आहोत…


साहित्य::

चार गुलाब खस आंबे किंवा चार केसर आंबे सहा चमचे इतकी साखर एक वाटीभर दूध

कृती:::

सर्वप्रथम आंबे स्वच्छ धुऊन घ्या.. साधारण एक तासापासून पाण्यामध्ये घालून ठेवा… त्याच्यामध्ये थंडावा निर्माण होईल… आता आंबे कोरडे करून घ्या… आंबे कोरडे केल्यानंतर बटाटे शिलाईच्या शिलनीने आंबा आपल्याला सोलून घ्यायचा आहे… आंब्याचे सर्व व्यवस्थित काढून घ्यायचे आहे.. आंब्याची साल काढल्यामुळे फक्त गर शिल्लक राहतो…त्याचे आंब्याचे तुकडे करून घ्या…. आंब्याचे तुकडे केल्यानंतर साधारण दोन आंब्याचे तुकडे मिक्सरमध्ये घाला… आणि त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्या…. ती एका पातेल्यामध्ये घाला… त्यानंतर दुसऱ्या दोन आंब्यांचाही घर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला… त्यामध्ये साखर घाला आणि थोडे दूध घाला… आता याची सुद्धा बारीक पेस्ट करून घ्यावी…. आता उरलेले दूध सुद्धा आपण मिक्सरमध्ये घालून त्या गरा सोबत फिरवून घ्यावे… सर्वे जिन्नस एकत्र करून घ्यावे…. आता आपला आमरस तयार झालेला आहे… तुम्हाला अजून दूध घालायची गरज वाटत असल्यास तुम्ही दूध घालू शकतात…. तुम्हाला आमरस जास्त गोड आवडत असल्यास त्यामध्ये अजून चार चमचे साखर तुम्ही घाला….. आमरस खाताना एका वाटीमध्ये आमरस घेऊन त्यावर गरम केलेले साजूक तूप घाला…. आणि चपाती सोबत आमरस एन्जॉय करू शकतात…. त्यासोबत भाजी खाण्यासाठी बटाट्याची भाजी किंवा कांद्याची भाजी तुम्ही बनवू शकतात… हा रस तुम्ही साधा सुद्धा खाऊ शकतात… इथे मी गुलाब खत आंब्यांचा वापर केलेला आहे… आंब्याचे खूप सारे प्रकार असतात केसर हापूस बदाम लालपाटा गुलाब खस तुम्हाला जे आवडत असतील त्या आंब्याचा तुम्ही वापर करू शकतात….. यामध्ये हापूस आणि लालपाटा याचा रस अत्यंत घट्ट होतो… त्यामध्ये आपल्याला दुधाचा वापर जास्त करावा लागतो… तुम्हाला दूध आवडत नसल्यास तुम्ही रसामध्ये दूध न घालता सुद्धा बनवू शकतात….

टिप्स::

आमरसामध्ये दूध घालताना ज्यावेळेस आपल्याला आमरस लगेच खायचा आहे त्यावेळेसच दूध घालावे… दूध खालून रस दोन-तीन तास किंवा चार पाच तास ठेवू नये… ज्यावेळेस आपण रस खायला बसू त्यावेळेसच आपण दूध यामध्ये मिक्स करावे….
परिमाण::
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण :चार व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7976

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.