खान्देश स्पेशल अंबाडीची पातळ भाजी

by Vaishali Chaudhari
11 views

खान्देश स्पेशल अंबाडीची पातळ भाजी


प्रस्तावना:::

अंबाडीची भाजी ही कोरडी पातळ दोन्ही प्रकारांमध्ये तयार केली जाते आता आपण आज पातळ भाजी बघणार आहे…. जी ज्वारीच्या भाकरी सोबत खाल्ली जाते आणि ज्वारीच्या कण्या घालून केली जाते….


साहित्य:::

  • एक जुडी अंबाडीची भाजी
  • एक वाटी ज्वारीचा जाडसर भरडा केलेल्या कण्या
  • पाव वाटी शेंगदाणे
  • अर्धी वाटी चवळी
  • बारा ते तेरा हिरव्या मिरच्या
  • बारा ते तेरा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • एक ते दोन चमचे तेल
  • जिरे
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा धनापूड
  • मीठ
  • पाणी


कृती:::

सर्वप्रथम अंबाडीची भाजी स्वच्छ धुऊन घ्या.. त्या भाजीचे पाने तोडून घ्या… दांडीचा वापर इथे आपल्याला करायचा नाही…

भाजी पुन्हा एकदा स्वच्छ धुऊन घ्या आणि तिला बारीक चिरून घ्या…. त्यानंतर चवळ्या ही आपल्याला वीस मिनिटे भिजत घालायचे आहे..

मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरच्या अद्रक आणि पाव चमचा धनापूर याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे…

तसेच ज्वारीचा जाडसर भरडा करून त्याच्या कन्या तयार करून घ्यायच्या… साधारण एक वाटी इतक्या पाण्याचा आपण वापर करणार आहे…

आता एका कुकरमध्ये चिरलेली भाजी घाला त्यावर अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घाला त्यानंतर ज्वारीच्या कण्या आणि भिजत घातलेली चवळीचे दाणे आणि शेंगदाणे घाला….

त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घाला…. आता यामध्ये दोन ग्लास इतके पाणी घाला… आता कुकर बंद करून घ्या साधारण अर्धा तास किंवा दहा ते बारा शिट्ट्या कुकरच्या होऊ द्या ..

शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचा गॅस बंद करा….. वरचा गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये म्हणजेच कुकर उघडून चवीप्रमाणे मीठ घाला…..

आता एका कढईमध्ये तेल घाला… त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला…. फोडणी घातल्यानंतर कुकरमध्ये तेल घाला ……

आणि कुकर मधले मिश्रण रवीच्या साह्याने जोडून घ्या….. म्हणजे सर्व व्यवस्थित एकत्र होईल… त्यानंतर ही गरम गरम भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत खायला द्या… आंबट तिखट अशा छानशा चवीची ही भाजी तयार आहे….


टिप्स:::

भाजी तयार करताना अंबाडीच्या भाजीची फक्त पानंचा वापर करायचा आहे…. आणि हे मिश्रण वापरून घेताना चांगले वापरायचे आहे कारण ज्वारीच्या कण्या कच्च्या राहू शकतात….


वेळ व परिमाण


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::६० मिनिटे
परिमाण::४ व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10641

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.