झणझणीत मसालेदार पातोळ्यांची भाजी
प्रस्तावना:::
आहा हा!!! किती छान पाऊस पडतो आहे बाहेर!!! आज हवीशी वाटते ना मसाल्याची भाजी!! तर गरमागरम पातोळ्यांची भाजी आपण खाऊया!!!
मसाला रस्सा साहित्य:::

- तीन कांदे
- पाव वाटी खोबरं किसून किंवा काप करून
- बारा ते पंधरा लसूण पाकळ्या
- सात लाल मिरच्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- खडा मसाले-पाच लवंग पाच मिरे पाच कपूरचीने एक बाजा फुल किंवा स्टार फुल अर्धा दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची
- पाव चमचा हळद
- पाव चमचा धणा पावडर
- चवीप्रमाणे मीठ
- फोडणीसाठी तेल
- कोथिंबीर
कृती:::
सर्वप्रथम तीन कांदे सोलून चिरून घ्यावे… तव्यावर चांगले तांबूस रंगावर भाजून घ्यावे…. त्यानंतर खोबऱ्याचे कापही तांबूस रंगावर भाजून घ्यावे….
लाल मिरच्या ही भाजून घ्याव्या…. मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम मिरच्या आणि खडे मसाले घालून वाटून घ्यावे म्हणजे त्याची बारीक पूड पूड होईल…


त्यानंतर हे सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालावे… त्यामध्ये भाजलेला कांदा भाजलेले खोबरे लसूण पाकळ्या अद्रकाचा तुकडा पाणी घालून बारीक अशी चटणी करून घ्यावी….

एकदम बारीक पेस्ट करावी…. त्यानंतर कढईमध्ये कडकडीत तेल गरम करावे…. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चटणीची पेस्ट घालावी…

तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावे…. चटणीला आजूबाजूला चांगले तेल सुटलेले असेल अशा वेळेस आपल्याला त्यामध्ये दोन ग्लास इतके गरम गरम पाणी घालायचे आहे…
इथे मी आधीच गरम पाणी करून ठेवलेले होते… आणि भाजीला दोन ते तीन उकळ्या येऊ द्याव्या… त्यानंतर भाजीवर झाकण ठेवावे…

भाजीवर झाकण काढून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे…. त्यानंतर पुन्हा तीन ते चार उकळ्या भाजी येऊ द्याव्या…
जितक्या भाजीला उकडा येतील तितकी भाजी चविष्ट लागेल… भाजीला उघड्या आल्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालावी….
मसाले भाजीमध्ये आपण तयार केलेल्या पातोळ्या त्यामध्ये घालाव्या…. त्यानंतर भाजीचा गॅस बंद करावा… आपली गरमागरम पातोळ्यांची भाजी आता तयार झालेली आहे…

ही भाजी तुम्ही चपाती भाकरी फुलके याच्यासोबत खाऊ शकतात आणि जीरा भाताबरोबर तर एकदमच छान लागते… गरमागरम पातोळ्यांची भाजी!!!!

टिप्स :::
पातोळ्या ज्या भाजीमध्ये पातोळ्या सगळ्यात शेवटी घालाव्या… ज्यावेळेस आपण गॅस बंद करणार आहे त्यावेळेस आपण त्यामध्ये पातोळ्या घालाव्या..
झणझणीत अशा पातोड्याची रेसिपी
प्रस्तावना:::
पातोड्याची भाजीची रस्सा तर आपण पाहिलाच आहे पण पातोळ्या कशा बनवायच्या ही रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे…पातोळ्या करताना काय काय आपल्याकडनं चुका होतात आणि पातोळ्या प्रॉपर बनत नाही याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे…
साहित्य:::

- एक मोठी वाटी बेसन
- १० ते १२ बारीक लाल मिरच्या किंवा बारीक हिरव्या मिरच्या
- बारा ते पंधरा लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- कोथिंबीर
- जिरे
- पाव चमचा हळद
- पाव चमचा गरम मसाला
- तेल
- चवीप्रमाणे मीठ
कृती:::
सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला बेसन पूर्ण विरघळून घ्यायचे आहे त्यामध्ये एकही गाठ होऊ देऊ नये…
त्यानंतर आपण पुढची तयारी करूया… मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरच्या येतच पेस्ट करून घ्यावी…. त्यानंतर कढईमध्ये कडकडीत गरम तेल करावे… गिरी तटवल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट घालून परतून घ्यावे….

त्यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला घालून परतून घ्या… त्यामध्ये एक ग्लास इतके गरम पाणी घाला…

त्यामध्ये पाण्याला उकळे आल्यानंतर आपण जो बेसनाचा घोळ तयार केलेला आहे तो घोल या पाण्यामध्ये सारखं ढवळत राहत आपल्याला घालायचा आहे….

मिश्रण अगदी सतत आपल्याला ढवळायचे आहे.. हे सर्व मिश्रण एकजीव होते आणि नंतर त्यामध्येच लगेच चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे…

मिश्रण सतत ढवळत राहिल्याने त्याच्या गाठी होत नाही आणि आपण जी पद्धत वापरलेली आहे आपण आधीच बेसन पाण्यामध्ये विरघळून घेतलेले होते त्यामुळे पातोळ्या करताना तुमच्या कुठल्याही प्रकारच्या गाठी होणार नाही…

पाण्यात घातल्यानंतर हे मिश्रण सतत ढवळत राहिले पाहिजे त्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला…
आता तुमचा घट्टसर बेसनाचा गोळा तयार झालेला असेल त्यावर झाकण ठेवा साधारण पाच ते दहा मिनिटे हा गोळा अगदी मंद आचेवर वाफवत घ्या….
त्यानंतर दोन ताटांना तेल लावा तो गोळा निम्मे निम्मे करा… हाताला चटका लागू नये म्हणून इथे मी पॉलिथिन पिशवीचा वापर करू शकता…

पिशवीला थोडे तेल लावून मग ते मिश्रण तुम्ही थापून घेऊ शकता… आणि थोडा चटका जर तुम्ही सहन करू शकत असले तर हाताला तेल लावून हे मिश्रण अलगदपणे थापून घ्यायचे आहे किंवा दुसरे असे की वाटीला तेल लावायचे आहे आणि ते वाटीच्या साह्याने पसरवून घ्यायचे आहे…
अगदी पतला लेयर आपल्याला तयार करायचा आहे…. त्यानंतर सुरीला तेल लावून त्याच्या शंकरपाळ्याच्या आकारामध्ये काप करून घ्यायचे आहे…

आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत या पातोळ्या अगदी नुसत्या खायसाठी सुद्धा चटपटीत लागतात…

लहान मुले तर बेसनाचे पदार्थ सहज खाऊन जातात तसेच मोठ्यांनाही या पातोळ्या अगदी प्रिय असतात….. आता गरमागरम आपल्या बेसनाच्या पिठापासून तयार केलेल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत!!!!
टिप्स::
इथे बेसनाचा घोल आपण तयार केलेला आहे यामुळे आपल्या पातोळ्यांच्या मिश्रणामध्ये गाठी होत नाही…. ही अगदी सोपी पद्धत आहे…. जर तुम्हाला असेही पाण्यामध्ये जर पीठ मोडू शकत असल्यास तसेही तुम्ही तयार करू शकतात…
