गरमागरम नाश्त्यासाठी उपमा

प्रस्तावना:::
अडचणीसाठी गरमागरम काय करावे असा पण विचार करत असतो!!! अशा वेळेस गरमागरम उपमा हा सगळ्यांना आवडणारा मेनू आहे…. आणि झटपट तयार होणारा मेनू आहे… एक महा रव्यापासून तयार केला जातो त्यासाठी तुम्ही घरगुती रवा सुद्धा वापरू शकता किंवा दुकानातला रवा सुद्धा वापरू शकतो….
साहित्य:::

- दोन वाटी रवा
- एक मोठा कांदा
- एक मोठा टोमॅटो
- सात ते आठ हिरव्या मिरच्या
- आठ लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- बारा ते तेरा कडीपत्त्याची पाने
- कोथिंबीर
- वीस ते पंचवीस शेंगदाणे
- दोन चमचे साजूक तूप
- फोडणीसाठी तेल
- जिरे मोहरी
- चवीप्रमाणे मीठ
- पाणी
कृती:::
सर्वप्रथम कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून रवा चांगला तांबूस रंगावर भाजून घ्या… रवा चांगला तांबू संपावर भाजल्यानंतर तो एका डिशमध्ये काढून घ्या…

त्यानंतर कढईमध्ये तेल घाला त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला मिरच्या शेंगदाणे घाला त्यानंतर कांदा घाला..

आता पाव चमचा हिंग घाला…कांद्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्या.. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याची पाने घाला आणि टोमॅटो घाला पुन्हा व्यवस्थित परतून घ्या..

आता यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट घाला.. आणि व्यवस्थित परतवून घ्या… सर्व मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये आपण जो रवा भाजून ठेवलेला आहे तो घाला…..

आणि व्यवस्थित एकसंध करा….. दुसऱ्या साईडला मोठे दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवा…. इथे मी दोन वाटी रव्यासाठी मोठे दोन ग्लास पाण्याचा वापर करत आहे…
तुम्हाला रवा घट्टसर हवा असेल तर तुम्ही दोन ग्लासचाच वापर करा…रवा एकत्रित झाल्यानंतर त्यामध्ये गरम उकडते पाणी घाला…..

रव्यावर झाकण ठेवून द्या…. दोन ते तीन मिनिटे चांगली वाफ आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला….
त्यानंतर चवीप्रमाणे मीठ झाल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्या… पुन्हा दोन ते तीन मिनिटे रवा चांगला वाफवून घ्या…
त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला… आणि एक ते दोन वाद आल्यानंतर गॅस बंद करा… आपल्या माता तयार झालेला आहे….

उपमा तयार करताना तुम्हाला उपमा किती मऊ हवा त्याप्रमाणे तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे… आता आपल्या गरम गरम उपमा तयार झालेला आहे….
त्यावर कोथिंबीर आणि बारीक शेव घालून सर्व्ह करा…. गरमागरम उपमा!!!!

टिप्स:::
उपमा करताना पाण्याचा वापर किती करावा हा प्रश्न पडतो.. बारीक रवा असल्यास एका वाटीला एक ग्लास पाणी पुरेसे असते…
वेळ आणि परिमण::
तयारी ची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ:: ३०मिनिटे
परिमाण:: ५जणांसाठी
