गरमागरम आलू वडा

by Vaishali Chaudhari
0 views

गरमागरम आलू वडा


प्रस्तावना:::

काय मंडळी बाहेर खूप छान पाऊस होतो.. आता असं वाटतंय ना काहीतरी तळलेले गरमागरम खाऊ असं…. तर मग विचार कसला करता चला झटपट आलू वडे बनवायला घेऊया….

आलू वडा हा सर्व प्रदेशांमध्ये खाल्ला जाणारा आणि प्रसिद्ध असा बटाट्यापासून तयार केला जाणारा वडा आहे…. वेगवेगळ्या पद्धतीने तयार केला जातो कोणी गरम मसाला वापरून तयार करतो तर कोणी अद्रक लसूण पेस्ट घालून तयार करतात असे त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत…


साहित्य:::

  • ६बटाटे
  • दहा ते बारा हिरव्या मिरच्या
  • पंधरा ते वीस लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • पाव चमचा हळद
  • चवीप्रमाणे मीठ
  • कोथिंबीर
  • एक चमचा ओवा
  • अर्धा चमचा पुदिना पावडर
  • तळण्यासाठी तेल
  • पाव चमचा सोडा
  • लिंबू फोड


कृती::

प्रथम बटाटे उकडून घ्या त्याचे साल काढून घ्या इथे मी बटाट्यांचे दोन दोन तुकडे केलेले आहे म्हणजे पटकन बटाटे उकडले जातील….

दोन शिट्ट्या घेऊन बटाटे उकडून घेतलेले आहे त्याचे साल काढून त्याचा लगदा तयार करून घ्या…

मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या अद्रक लसूण कढीपत्ता अर्धा चमचा पुदिना पावडर घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या….

एका कढईमध्ये तेल गरम करा त्यामध्ये अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घाला आणि चांगले व्यवस्थित परतून घ्या त्यामध्ये पाव चमचा हळद घाला …..

आणि त्यावर बटाट्याचा लगदा झाला आणि चवीप्रमाणे मीठ घाला हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या… गॅस बंद करून घ्या आणि बटाट्याचे मिश्रण थंड होऊ द्या …..

तोपर्यंत आपण बेसन भिजवून घेऊ एका पातेल्यामध्ये बेसन घालून त्यामध्ये मीठ घाला ओवा घाला आणि पाणी घालून व्यवस्थित बॅटर तयार करून घ्या…

या बॅटर मध्ये गुठळ्या होऊ देऊ नका आणि त्यामध्ये पाव चमचा सोडा घाला त्यावर अर्ध्या लिंबाची फोड पिळून घ्या आता हे सोड्याचे मिश्रण ऍक्टिव्हेट होईल ….

आणि हळूच विस्करच्या साह्याने एकत्र करून घ्या आता आपले बेसनाचा घोल तयार झालेला आहे…. आता कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा आणि त्याची गॅसची आस मंद करा ……

आणि बटाट्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि बेसनाच्या मिश्रणामध्ये घोळवून तळा…आलू वडे मंद आचेवर तळुन घ्या…

मंद आचेवर आलू वडे चांगले तळले जातात आणि मधले मिश्रण चांगले वाफले जाते त्यामुळे आलू वडे तळताना गॅसचा आज मंदच ठेवा ……

आपले आलू वडे तयार झालेले आहेत हे तुम्ही तळलेल्या मिरची सोबत सर्व्ह करू शकतात…


टिप्स:::

आज मी तुम्हाला बेसनामध्ये सोडा घालून त्यावर लिंबू रस घालण्याची जी ट्रिक सांगितली ती ट्रिक वापरून तुमचा अलवडा अत्यंत खमंग असा तळला जाईल आणि कुरकुरीत होईल.…


वेळ आणि परिमाण:


तयारीची वेळ::३० मिनिटे
एकूण वेळ:: ६०मिनिटे
परिमाण::४ व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

10995

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.