काबुली चण्याची चटपटीत अशी उसळ

by Vaishali Chaudhari
8 views

काबुली चण्याची चटपटीत अशी उसळ


प्रस्तावना:::

काबुली चण्याची चटपटीत अशी उसळ

आपण रोजच्या जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उसळी खातो जसे की मटकीची उसळ चवळीची, उसळ हिरवे मुगाची उसळ, हरभऱ्याची उसळ, उसळीचे बरेच प्रकार असतात… त्यातच आपण काबुली चण्याचे छोल्यांची भाजी करतो… पण आज त्याची आपण उसळ केलेली आहे…. ही उसळ एकदम चवीला छान लागते…. आणि पटकनही शिजते….


साहित्य:::

  • एक वाटी चणे रात्रभर पाण्यात भिजवलेले,
  • एक कांदा
  • दोन ते तीन कढीपत्त्याची पाने
  • कोथिंबीर
  • दहा ते बारा लसूण पाकळ्या
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
  • पाव चमचा हळद
  • दीड चमचा तिखट
  • एक चमचा धनापूर
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • चिमूटभर हिंग
  • फोडणीसाठी तेल
  • आणि चवीप्रमाणे मीठ
काबुली चण्याची चटपटीत अशी उसळ – फोटो 2


कृती:::

एक वाटी काबुली (म्हणजेच जे पांढरे चणे असतात त्याला काबुली चणे असे म्हणतात)चणे सकाळी धुवून स्वच्छ कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये वाफवून घ्या….

चणे चांगले वाफल्यानंतर गॅस बंद करा चण्यातील पाणी एका बाजूला व्यवस्थित बाहेर काढून घ्या…. यातल्या थोड्याशा पाण्याचा आपण वापर नंतर करणार आहे….

आता पंधरा व्यवस्थित बारीक चिरून घ्या… मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक आणि लसणाची पेस्ट करून घ्या…

कढईमध्ये फोडणीसाठी तेल घाला… तेल कडकडीत गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून तडतडून घ्या त्यामध्ये कढीपत्ता घाला त्यानंतर त्यामध्ये कांदा घाला……

काबुली चण्याची चटपटीत अशी उसळ – फोटो 3

कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत परतवून घ्या…. त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला… मिश्रण व्यवस्थित परतून घ्या….

त्यामध्ये चिमूटभर हिंग घाला..हे मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद दीड चमचा तिखट एक चमचा धना पूड अर्धा चमचा गरम मसाला मिश्रण व्यवस्थित परतून घ्या……

मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर त्याला छान तेल सुटेल….. त्यामध्ये उकडलेले कबुली चणे घाला.. व्यवस्थित मिक्स करून घ्या ………

काबुली चण्याची चटपटीत अशी उसळ – फोटो 4

आता दोन ते तीन मिनिटे चण्यांना चांगली वाफ येऊ द्या…. चंदन चांगली वाफ आल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…

आपण जे उकडलेले पाणी थोडेसे ठेवले होते त्यातले साधारण दोन ते तीन टेबलस्पून इतके तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकतात…

काबुली चण्याची चटपटीत अशी उसळ – फोटो 5

तुम्हाला रसदार मी उसळ आवडत असल्यास थोडे जास्तही घातले तरी चालेल…. आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला….

आपली कबुली चण्याची उसळ तयार झालेली आहे…. ही उसळ अत्यंत चटपटीत अशी लागते…. यावर तुम्ही छान लिंबू बारीक शेव घेऊन खाऊ शकतात….

किंवा ही उसळ पुरी ,चपाती, बटर नान, फुलका, खारा पराठा यासोबत खाऊ शकतात…..


टिप्स:::

काबुली चण्याची चटपटीत अशी उसळ – फोटो 6

काबुली चणे तुम्हाला असे वाटत असल्यास की आपले चणे जुने आहेत तर तुम्ही चणे वाफवताना चिमूटभर सोडा घालावा म्हणजे चणे व्यवस्थित नरम होतील…..


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ :१० मिनिटे
एकूण वेळ:४० मिनिटे
परिमाण :दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.