व्हेज मायो पराठा- Veg Mayo Paratha

by Vaishali Chaudhari
215 views

व्हेज मायो पराठा


प्रस्तावना::

व्हेज मायो पराठा हा लहान मुलांना अत्यंत आवडीचा आहे सकाळच्या टिफीन साठी करता येणारा असा आहे.

व्हेज मायो पराठा- Veg Mayo Paratha


साहित्य::

व्हेज मायो पराठा- Veg Mayo Paratha – फोटो 2


१ छोटा कांदा
१ छोटा टोमॅटो
१ तुकडा फ्लावरचे फुल
१ जाड मिरची
कोथिंबीर
१ चमचा मायोनीज
१ चमचा तंदुरी मायोनीज
२ चिमटी ओरिगॅनो
१ चिमटी मीठ
पिठ ( कणिक)
नरम लुसलुस कणकेचा गोळा(पूरणाच्या कणीक प्रमाणे)
पराठयाला लावायला तूप

कृती::

सर्व भाज्या कांदा, टोमॅटो,मिरची , कोथिंबीर बारीक चिरून घ्या.फ्लॉवर खिसून घ्या.

एका भांड्यात सर्व कापलेल्या भाज्या, चवीप्रमाणे मीठ घाला.१ चमचा मायोनीज घाला.

व्हेज मायो पराठा- Veg Mayo Paratha – फोटो 3

१ चमचा तंदुरी मायोनीज घाला.चिमटीभर ओरिगानो घाला.व्यवस्थित एकत्र करून घ्या.

आता कणकेचा गोळा घेऊन त्यात पूरणा प्रमाणे मिश्रण भरून घ्या. त्याला पीट लाऊन पोळी प्रमाणे पराठा लाटून घ्या.

व्हेज मायो पराठा- Veg Mayo Paratha – फोटो 4

तवा गरम करून पराठा दोनही बाजूने खरपूस भाजून घ्या.त्याला तूप लावा. व्हेज मायो पराठा तयार आहे.

व्हेज मायो पराठा- Veg Mayo Paratha – फोटो 5

हा पराठा सॉस सोबत खाऊ शकतात.किंवा दहीसोबत खाऊ शकतात.

टिप्स::

पराठा मिश्रणामध्ये चीज खिसून घालू शकता.पराठा बनवताना पराठा फाटू नये म्हणून कणिक केव्हापासून भिजून ठेवा चांगली मुरेल. व पराठा फाटणार नाही.

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण:१ मुलासाठी

You may also like

1 comment

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.