मक्याची चटपटीत अशी चपाती किंवा पराठा किंवा पोळी

by Vaishali Chaudhari
0 views

मक्याची चटपटीत अशी चपाती किंवा पराठा किंवा पोळी


प्रस्तावना:::

मक्याच्या पिठाची आपण भाकरी खातो पण मुलांना भाकरी साधी आवडत नाही.. त्यासाठी आपण काही नवीन इनोव्हेटिव्ह त्यांना खाऊ घातल्यास त्या आवडीने खातात…. त्यासाठी आपण एक वेगळा पराठ्याचा प्रकार म्हणा किंवा मसालेदार चपाती म्हणा आज आपण तयार करणार आहे…


साहित्य:::

  • एक मोठी वाटी मक्याचे पीठ
  • एक मोठा कांदा
  • कोथिंबीर
  • चार ते पाच हिरव्या मिरच्या
  • सात ते आठ लसूण पाकळ्या
  • पाव चमचा हळद
  • पाव चमचा तिखट
  • पाव चमचा ओवा
  • पाव चमचा तीळ
  • चवीप्रमाणे मीठ
  • आणि तेल
  • साजूक तूप


कृती:::

मक्याचे पीठ दळून आणा… मक्याचे पीठ जाडसर असले तरी चालेल… जी पीठ आपण भाकरीला वापरतो त्या पिठाचाच आपण पराठा बनवू शकतो….

कांदा सोलून घ्या आणि कांदा किसून घ्या… लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घ्या… कोथिंबीर बारीक चिरून घ्या…

आता मक्याच्या पिठामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा तिखट पाव चमचा ओवा पाव चमचा तीळ चवीप्रमाणे मीठ घाला सर्व मिश्रण एकत्रित करून घ्या….

त्यानंतर यामध्ये किसलेला कांदा मिरची आणि लसणाची पेस्ट घाला… चिरलेली कोथिंबीर घाला…आणि थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा मळून घ्या…

साधारण कणकेप्रमाणे आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे… आणि थोडे एक चमचा तेल घालून गोळा मळून घ्या….

त्यानंतर याची छोटी छोटी गोळे तयार करा. आता पोळीपाटावर ज्याप्रमाणे चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला पराठा किंवा मक्याची चपाती लाटून घ्यायची आहे..

ही चपाती लाटताना आपल्याला जास्त पिठाचा वापर करावा लागेल… या पराठ्याला आजूबाजूने चिरा जातात..

त्याची चिरा दाबून घेऊन त्याला बोलसर आकार देऊन पुन्हा लाटून घ्या… म्हणजे गोल असा पराठा तयार होईल….

आपण ज्यावेळेस गोळा तयार करतो त्यानंतर लगेचच आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत… कारण याला पाणी सुटते…

त्यामुळे पराठा लाटताना अवघड होऊ शकते… आता तवा गरम करून त्यावर पराठा किंवा चपाती शिकून घ्यायची आहे..

दोन्ही बाजूला चांगली खरपूस शिकून घ्यायची आहे आणि त्यावर साजूक तूप लावायचे आहे… आपल्या मक्याचा हेल्दी पराठा तयार झालेला आहे..

हा पराठा मुलांना पातळ शेंगदाणा चटणी सोबत किंवा लोणच्या सोबत सॉस सोबत तसेच तुम्ही देऊ शकतात…. मुले हा पराठा अगदी आवडीने खातील…. या पराठ्यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे पत्ताकोबी खीस सिमला मिरची घालू शकतात…


टिप्स:::

पराठा भिजवताना गोळा कडक सर भिजवावा… कारण कांद्याला पाणी सुटते.. त्यामुळे पोळी लाटताना फाटू शकते…


वेळ व परिमाण:::


तयारीची वेळ ::१०मिनिटे
एकूण वेळ ::३०मिनिटे
परिमाण: दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8972

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.