फ्लावर बटाटा मिक्स भाजी
प्रस्तावना:
डब्यामध्ये कोरडी भाजी नेण्यास सोयीस्कर होते. लहान मुलांना फ्लावर बटाटा मिक्स भाजी आवडते.
साहित्य:

- पाव किलो फ्लावर,
- दोन बटाटे,
- आठ ते दहा हिरव्या मिरच्या,
- एक टोमॅटो,
- एक कांदा,
- सात ते आठ लसूण पाकळ्या,
- अर्धा इंच अद्रक,
- जिरे मोहरी,
- फोडणीसाठी तेल,
- पाव टी स्पून हळद,
- पाव टीस्पून तिखट,
- मीठ,
कृती:
फ्लावर बटाटा चिरून घेणे. फ्लावर बटाटा गरम पाण्यामध्ये धुऊन घेणे.
कांदा व टोमॅटो बारीक चिरून घेणे. अद्रक लसूण ची पेस्ट करून घेणे.
हिरव्या मिरच्यांचे काप करून घेणे.
एका कढईमध्ये तेल गरम करावे त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालावी.
त्यामध्ये हिरव्या मिरच्यांचे काप,चिरलेला कांदा, टोमॅटो परतून घ्यावे. तांबूस रंगावर झाल्यानंतर त्यामध्ये हळद तिखट घालावे.
फ्लावर बटाटा घालून परतून घ्यावे.
त्यावर झाकण ठेवावे. पाच मिनिटे वाफले गेल्यानंतर भाजी शिजली की नाही हे बघा.
भाजी शिजल्यानंतर त्यावर चवीप्रमाणे मीठ घालावे.
पुन्हा एक मिनिटे वाफ येऊ द्यावी. नंतर भाजी चिरलेली कोथिंबीर घालावी. आपली फ्लावर बटाट्याची मिक्स भाजी आता तयार आहे.

टिप्स:
भाजी ही अर्धवट शिजल्यावरच मीठ घालावे. कारण लवकर मीठ घातल्यास भाजी शिजत नाही.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ:२० मिनिटे
एकूण वेळ : ४०मिनिटे
परिमाण: ३ जणांसाठी
डब्यासाठी फ्लावर बटाटा मिक्स भाजी
कोरडी भाजी डब्यात नेण्यासाठी सोयीची असते आणि फ्लावर-बटाट्याची ही भाजी लहान-मोठ्या सर्वांना आवडते. कांदा, टोमॅटो आणि अद्रक-लसणाच्या फोडणीमुळे भाजीला छान चव येते.
बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा
- फ्लॉवर गरम पाण्यात धुऊन घ्या, म्हणजे तो स्वच्छ होतो.
- भाजी झाकण ठेवून वाफेवर शिजवा; जास्त पाणी घालू नका.
- भाजी शिजल्यानंतर मीठ घाला आणि पुन्हा एक मिनिट वाफ येऊ द्या.
- कांदा-टोमॅटो तांबूस रंगावर परतल्यावरच हळद-तिखट घाला.
कशासोबत खावा
चपाती, पोळी किंवा भाकरीसोबत ही भाजी छान लागते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
फ्लॉवर स्वच्छ कसा करावा?
फ्लॉवरचे तुरे कोमट मीठ-पाण्यात थोडा वेळ ठेवून मग धुतल्यास तो स्वच्छ होतो.
भाजी मऊ पडते, काय करावे?
आच मध्यम ठेवा, पाणी कमी घाला आणि जास्त वेळ शिजवू नका.
तिखट कमी करायचं असेल तर?
हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी करा.

![झटपट कोरडी शेव भाजी [लहान मुलांचे डब्यावाली]](https://swaadgharcha.com/wp-content/uploads/2025/10/WhatsApp-Image-2025-11-04-at-11.53.33-2-768x1324.jpg)





