कांद्याची भाजी किंवा झणझणीत अशी कांद्याची चटणी कोंबडा कांद्याची भाजी

by Vaishali Chaudhari
0 views

कांद्याची भाजी किंवा झणझणीत अशी कांद्याची चटणी कोंबडा कांद्याची भाजी


प्रस्तावना:::

बऱ्याचदा प्रश्न पडतो आज काय भाजी बनवायची हा प्रश्न मिटवण्यासाठी कांद्याची भाजी किंवा कांद्याची चटणी झटपट बनवून तयार करतात.. कारण पांडे नेहमीच घरात असतात…


साहित्य::

  • दहा कांदे
  • आठ ते दहा लसूण पाकळ्या
  • कोथिंबीर
  • एक चमचा तिखट
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा धनापूड
  • अर्धा चमचा गरम मसाला
  • फोडणीसाठी तेल
  • चवीप्रमाणे मीठ


कृती,:::

सर्वप्रथम कांदे व्यवस्थित सोलून घ्या… कांदे सोडल्यानंतर कोंबडा कांदा कापून घ्या.. कोंबडा कांदा म्हणजे कांदे हे मधून दोन तुकडे करून लांबोळक्या आकाराने कापून घ्या….

मी फोटोमध्ये दाखवलेलेच आहे…. कांदा लांबट कापल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या… आणि चाळणीमध्ये निथळून घ्या….

आता लसणाचे सुद्धा काप करून घ्या…. कोथिंबीर बारीक चिरून घ्या…. एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा. कढईमध्ये जिरे मोहरी फोडून घाला…

जिरे मोहरी फोडणी घातल्यानंतर लसणाचे काप घाला.. त्यामध्ये कांद्याचे लांबी काप घाला…

कांद्याचे लांबी काप घातल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनापुड घालून कांदा व्यवस्थित एकत्र करून घ्या….

आता यावर झाकण ठेवून चांगले पाच ते दहा मिनिटे वाफवून घ्या…. कांदा वाफवत असताना अधून मधून ढवळून घ्या…

आता दहा मिनिटे झाल्यानंतर कांदा आपला बऱ्यापैकी शिजलेला असेल… त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…

चवीप्रमाणे मीठ घातल्यानंतर साधारण पुन्हा पाच ते सहा मिनिटे झाकण ठेवून आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे..

कांद्याला छान तेल सुटलेले असेल… कांद्याच्या भाजीसाठी आपल्याला तेलाचा वापर चांगला करायचा आहे…

अर्धी वाटी शेंगदाणे चांगले भाजून घ्या त्याचे बारीक कूट करून घ्या… हे कुठ सुद्धा तुम्ही कांद्याच्या चटणी मध्ये घालू शकता…

इथे मी शेंगदाण्याचा कुटाचा वापर केलेला नाही… जर आवडत असल्यास तुम्ही घालू शकता…. हे ऑप्शनल आहे…

आता आपल्या कांदा चांगला शिजवून त्याला तेल सुटलेले आहे आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला… आपल्या कांद्याची भाजी किंवा कांद्याची चटणी तयार झालेली आहे…

ही कांद्याची चटणी तुम्ही चपाती सोबत भाकरी सोबत तसेच कशा सोबत भाजी म्हणून खाऊ शकता…. तर आपण एन्जॉय करूया कांद्याची चटणी….


टिप्स:::

कांद्याची भाजी करताना तेलाचा वापर थोडा जास्त करायचा आहे.. कारण कांद्याची भाजी शिजण्यास थोडा वेळ जास्त लागतो… आणि ही तेलामध्ये चांगली परतवली जाते…


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ :२०मिनिटे
एकूण वेळ :४०मिनिटे
परिमाण: तीन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8068

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.