स्पायसी आलू मसाला

by Vaishali Chaudhari
99 views

🥘 १. रेसिपीचं नाव

स्पायसी आलू मसाला

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —

३. प्रस्तावना

थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,

📝 ४. साहित्य (Ingredients

  • 4 बटाटे
  • 2 कांदा,
  • 8लसूण कळ्या.
  • १ आले तुकडा,
  • मीठ,चवीप्रमाणे,
  • 1/4 चमचा हळूद,
  • 1/2 चमचा गरम मसाला,
  • जीरे मोहरी,
  • कोथींबीर.
  • चमचा तिखट,
  • 4 टेबलस्पून तेल,

🔥 ५. कृती (Steps)

प्रथम बटाटे स्वच्छ धुऊन घ्या बटाट्याचे साल काढून घ्या. साल काढल्यानंतर बटाटे बारीक अशी चिरून घ्या.

कांदा सोलून बारीक चिरून घ्या. अद्रक लसणाची पेस्ट करून घ्या.गॅसवर एक कढई ठेवा.

कढाई मध्ये चार पळ्यातील घाला. तेल चांगले कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला.

जिरे मोहरीची फोडणी घातल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घाला. कढीपत्ता परतल्यानंतर त्यामध्ये कांदा घाला.

कांदा तांबूस रंगावर परतला की कांदा झाले असे समजावे. कांद्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला.
लगेचच त्यामध्ये हळद एक चमचा तिखट अर्धा चमचा गरम मसाला घाला. मिश्रण चांगले परतवून घ्या.

मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये चिरलेले बटाटे घाला. बटाटे घातल्यानंतर मिश्रण चांगले परतवून घ्या.

ही बटाट्याची भाजी आपण तेलामध्येच परतवणार आहोत त्यामध्ये पाणी चा वापर करणार नाही.

तेलात परतवलेली भाजी अत्यंत रुचकर लागते. तसेच आपण यामध्ये कांद्याचा वापर जास्त केलेला आहे.

कारण कांद्यामुळे आपल्या भाजीला चव येते. यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला नाही.

आपल्याला आवडत असल्यास तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकतात. बटाट्याच्या भाजीवर झाकण ठेवावे.

व भाजी सारखी ढवळत राहावी. त्यामुळे भाजी लागणार नाही.

भाजी चांगली खरपूस होईल भाजी मधील बटाटा शिजत आला की त्यामध्ये मीठ चवीप्रमाणे घालावे.

भाजी ही वाफेवर चांगली परतली जाईल. त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला.

आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. या बटाट्याच्या भाजी सोबत तुम्ही चपाती किंवा पुरी खाऊ शकतात.

(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)

💡 ६. टिप्स (Cooking Tips)

बटाट्याची भाजी करताना बटाट्याची काप अत्यंत बारीक करावे त्यामुळे भाजी पटकन शिजते. भाजीमध्ये कांद्याचा वापर जास्त करावा जेणेकरून मसाला चांगला तयार होईल आणि भाजी अत्यंत रुचकर लागेल.

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

भाकरी, चपाती किंवा भातासोबत उत्तम लागते.

🕒 ८. वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: १५ मिनिटे
• एकूण वेळ: २५ मिनिटे
• परिमाण: २ जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. आठवड्याच्या शेवटी नक्की करून बघा!

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11639

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.