अगदी मऊ असा तोंडात विरघळणारा मोहनथाल!!! Mohalthal -Mohanthal Recipe in Marathi, Soft Mohanthal

0 views

हलवाईसारखा मऊ आणि खमंग मोहनथाळ | अगदी मऊ असा तोंडात विरघळणारा मोहनथाल!!! Mohalthal तोंडात विरघळणारा दाणेदार मोहनथाळ घरी बनवा | हलवाईसारखा मऊ आणि खमंग मोहनथाळ | बेसनापासून बनवा स्वादिष्ट मोहनथाळ | Mohanthal Recipe


प्रस्तावना/ Introduction:::

मोहन काळ म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते आणि कुठलेही सण आले की मग आपल्याला गोड खाण्याची तीव्र इच्छा होते…. जसे की दिवाळी दसरा तसेच गोकुळाष्टमी असे काही सण आले की आपल्याला गोड बनवायचे असते त्यातल्या त्यात वाढदिवस यासाठी सुद्धा आपण असे मिष्ठान्न बनवू शकतो…. अगदी सोप्या पद्धतीने हे मोहनथाल कसे बनवता येईल??? तसेच त्याचा पाक मला जमेल का??? असे बरेच प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात…. त्या प्रश्नाचे उत्तर आपणास शोधणार आहे….


साहित्य/ Ingredients:::::


दीड वाटी बेसन एक वाटी साजूक तूप एक वाटी साखर पाच ते सहा बदाम पाच ते सहा काजू दोन हिरवी वेलची एक चिमूटभर पिवळा रंग एक वाटी साईसकट दूध गुलाबाच्या पाकळ्या


कृती /Procedure:::

सर्वप्रथम आपण बेसन एका मोठ्या पातेल्यात घेऊन त्यामध्ये दोन चमचे तूप घालून आणि दोन चमचे दूध घालून आपण ते व्यवस्थित एकत्र करून घेऊ म्हणजे त्याला व्यवस्थित मोहन बसेल दहा मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा म्हणजे आपले मिश्रण फुलून येईल….

मिश्रण छान असे फुलल्यानंतर आपल्याला ते मोकळे करून घ्यायचे आहे…

मिश्रण मोकळे केल्यानंतर जाड चाळणीच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण चाळून घ्यायचे आहे म्हणजे आपले बेसनाचे मिश्रण चांगले रवेदार होईल आपले मोहन दाळ सुद्धा रवेदार बनेल ही तोंडाला चिकटणार नाही….

त्यासाठी आपल्याला जाड चाळणीने चाळून घ्यायचे आहे हे मिश्रण चाळून झाल्यानंतर एका कढईमध्ये एक वाटी तूप गरम करा दोन चमच तूप इतके राहू द्या…

त्यानंतर त्यामध्ये आपण चाललेले बेसन घाला…

बेसन घातल्यानंतर ते सतत सात ते आठ मिनिटे मंद आचेवर परतावत रहा…

मिश्रण सतत ढवळत रहावे जेणेकरून कडेला चिकटणार नाही…

मिश्रण सतत ढवळत राहिल्यानंतर त्याला आपोआप आजूबाजूंनी तूप सुटेल….

आता आणखी तू सुटण्यासाठी आजूबाजूने जे आपण दोन चमचे तूप राहू दिले होते ते तूप सोडा….

आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटे चांगले तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्या….

छान तांबूस रंग येईपर्यंत परतवा….

आणि गॅस बंद करा….


साखरेच्या पाकाची कृती/Preparation of Sugar syrup:::

एका बाजूला पातेल्यात एक वाटी साखर अर्धी वाटी पाणी घालून शिजवा.

सतत ढवळत रहा…. वेलची पावडर तयार करून पाकमध्ये घाला…

आता चिमूट भर पिवळा रंग घाला…दोन तारी पाक करा …दोन तारी पाक होईपर्यंत मिश्रण शिजवा…

बोटावर घेऊन चेक करा…

नाहीतर वाटीत पाणी घेऊन त्यात पाकाचा थेंब टाकून बघा….

तळाशी घट्ट झाला म्हणजे पाक तयार झाला असे समजावे….
आता हे मिश्रण बेसनाच्या मिश्रणामध्ये हा तयार केलेला पाक घाला अगदी एक मिनिटे मिश्रण परता…

आणि डिश ला तूप लावा…म्हणजे बर्फी लगेच निघेल….

आता हे मिश्रण तयार झालेले ताटात पसरवा…..

सेट होण्यासाठी १५ मिनिटे ठेवा….

थंड झाले की मोहनथाल सेट होते….त्यावर काजू बदाम चे काप घाला….

त्यानंतर त्यावर गुलाब पाकळ्या पसरवा… थंड झाले की हव्या त्या आकारांमध्ये कापून घ्या…


टिप्स/Tips::

मोहनथाल तयार करण्यासाठी मोहन देणे आवश्यक आहे…

त्यामुळे मोहनथाल रावेदार होते… चिकट होत नाही… खाण्यास एकदम अप्रतिम लागते….


वेळ आणि परिमाण Time and Quantity::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::५० मिनिटे
परिमाण::१० बर्फी जवळपास


टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords:::

अगदी मऊ असा तोंडात विरघळणारा मोहनथाल!!! Mohalthal -Mohanthal Recipe in Marathi, Soft Mohanthal

#Mohanthal #MohanthalRecipe #GujaratiSweet #IndianSweets #BesanSweet #TraditionalSweet #HomemadeSweets #SweetRecipe #DiwaliSpecial #MarathiRecipe

Anarase Pith Anarsa Flour Anarsa Pith Anarsa Preparation Anarsa Recipe DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Sweets Indian Traditional Sweets JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी

You may also like

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
आईसक्रीमइतरउडीपीउपवासउपवास पापडउपवास विशेषऋतु नुसारकिलबिलकेककैरी लोणचेकोजागिरीखान्देश विशेषगणेश चतुर्थीगुजरातीगोडगोडवाचटणी-कोशिबीरचटर पटरचायनीजझटपट (फास्ट फूड)झणझणीत-मसालेदारतांबडा रस्सादिवाळी फराळनानकटाईन्याहरीपंजाबीपराठा / भाकरीपापडपेयप्रादेशिकबर्फीबेकरीमकरसंक्रातीमसालेदारमहाराष्ट्रीयनमुंबई स्पेशलरस्सा भाजीलस्सीलाडूलिंबू लोणचेलोणचेवर्षभर साठवणूक चटपटीतशिराशेकसण विशेषसरबतसुकी भाजीसूपहळद मिरची लोणचेहिरवा रस्साहोळी
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.