उपवासाचे चटपटीत फ्रेंच फ्राईज. !!!Fast Spicy French Fries

उपवासात खा चमचमीत फ्रेंच फ्राईज!

0 views

उपवासाचे चटपटीत फ्रेंच फ्राईज. !!!Fast Spicy French Fries

कुरकुरीत बटाट्याची सोपी उपवास रेसिपी | उपवासासाठी बनवा झटपट चटपटीत फ्रेंच फ्राईज | Crispy French Fries | Upvas Recipe


प्रस्तावना/Introduction:::

उपासाचे फ्रेंच फ्राईज ही एक नवीन संकल्पना आहे….

उपवासाला सुद्धा आपल्याला नवनवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते….

आणि बटाट्याचे पदार्थ म्हटले म्हणजे सर्वांनाच खूप आवडतात…..

त्यात सर्वांना तळलेले पदार्थही खूप आवडतात त्यामुळे आपण अशी एक रेसिपी आणली आहे किती झटपट होईल….


साहित्य Ingredients:::

चार बटाटे तळण्यासाठी तेल तिखट मीठ काळे मीठ किंवा सेंधव मीठ


कृती/Procedure:::


ज्याप्रमाणे आपण साधे फ्रेंच फ्राईज बनवतो त्याप्रमाणेच हे फ्रिज प्राईस सुद्धा तयार केले जातात….

त्यासाठी आपण इंदुरी बटाट्याचा वापर केला तर ते एकदम चवीला चांगले लागतात….

म्हणजे हा बटाटा आतूनही पांढराशुरा असतो….

त्यासाठी मी इथे चार बटाट्यांचा वापर केलेला आहे बटाटे छान धुऊन घ्यायचे त्याची साल काढून घ्यायची… त्यानंतर तुमच्याकडे फ्रेंच फ्राईज करण्याचे मशीन असल्यास त्यामध्ये तुम्ही फ्रेंच फ्राईज कट करून घेऊ शकता….

किंवा नसेल तर बटाट्याची तीन भाग करून बारीक असे सुरीच्या साह्याने फ्रिज प्राइस कापून घेऊ शकता….

त्यानंतर मला च्या साह्याने ते कोरडे करून घ्या त्यातील पाण्याचा ओलसरा कमी करून घ्या त्यानंतर त्यावर तुम्हाला शिंगाड्याचे पीठ भुरभुरवायचे आहे…. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ व्हायचे आहे…..

इथे तुम्ही शिंगाड्याच्या पिठाच्या ऐवजी साबुदाण्याचे पीठ सुद्धा वापरू शकतात आणि तुम्ही उपवासाची भगर त्याचे सुद्धा पीठ तयार करून घेऊन त्याचा सुद्धा वापर करू शकतात आम्ही काही उपवासांना भगर चा वापर करत नाही त्यामुळे इथे मी त्या पिठाचा वापर न करता शिंगाड्या पिठाचा वापर केलेला आहे….

या पिठामुळे आपल्या फ्रेंच फ्राईज ला कुरकुरीतपणा घेतो…..

आता हे कढईमध्ये तेल कडकडीत गरम करा तेल चांगले कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण तयार केलेले फ्रेंच प्राईज घाला…

ते साधारण पाच ते सात मिनिटे दोघ बाजूने तळून घ्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे म्हणजे छान असा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे…..

फ्रेंच फ्राईज चांगले तांबूस रंग येईपर्यंत तळल्यानंतर ते आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचे आहे….

तुम्ही जर उपवासासाठी फक्त सैंधव मिठाचा वापर करत असल्यास तुम्ही यावर सेंधव मीठ आणि तिखट भुरभुरवून हाताने एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्या…

किंवा तुम्ही काळे मीठ जरी वापरत असल्यास ते सुद्धा तुम्ही यावर भरू शकतात…..

त्यामुळे चटपटीतपणा तयार होईल….

आता उपवास असल्यामुळे आपण इथे चाट मसाला चा वापर केला नाही त्याऐवजी काळया मिठाचा वापर आपण करू शकतो….

चला मग एन्जॉय करूया झटपट अशी उपवासाची फ्रेंच फ्राईज!!!!


टिप्स Tips:::

फ्रेंच प्राईज बनवताना इथे तुम्ही साबुदाणा पिठाचा सुद्धा वापर करू शकतात किंवा एकादशी असल्यास भगर पिठाचा वापर करू शकतात मी इथे शिंगाळ्या पिठाचा वापर केलेला आहे….

भगर (वरीचे तांदूळ)च्या पिठाचा वापर केल्यास फ्रेंच फ्राईज एकदमच कुरकुरीत होतील….. ज्यावेळेस तुम्ही एकादशीसाठी फ्रेंच फ्राईज बनवाल त्यावेळेस भगर भगर म्हणजे वरीचे तांदूळ च्या पिठाचा नक्की वापर करा…


वेळ आणि परिमाण Time and Quantity::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::१ व्यक्ती साठी
टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords:::

उपवासाचे चटपटीत फ्रेंच फ्राईज. !!!Fast Spicy French Fries

#उपवासरेसिपी #उपवासाचेपदार्थ #फ्रेंचफ्राईज #चटपटीतफ्रेंचफ्राईज #मराठीरेसिपी #VratSpecial #UpvasRecipe #PotatoRecipe

Anarsa Preparation DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe Festive Recipes GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Snacks Indian Sweets JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Swaad GharCha sweet Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti Vrat Special Recipe {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी

You may also like

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
आईसक्रीमइतरउडीपीउपवासउपवास पापडउपवास विशेषऋतु नुसारकिलबिलकेककैरी लोणचेकोजागिरीखान्देश विशेषगणेश चतुर्थीगुजरातीगोडगोडवाचटणी-कोशिबीरचटर पटरचायनीजझटपट (फास्ट फूड)झणझणीत-मसालेदारतांबडा रस्सादिवाळी फराळनानकटाईन्याहरीपंजाबीपराठा / भाकरीपापडपेयप्रादेशिकबर्फीबेकरीमकरसंक्रातीमसालेदारमहाराष्ट्रीयनमुंबई स्पेशलरस्सा भाजीलस्सीलाडूलिंबू लोणचेलोणचेवर्षभर साठवणूक चटपटीतशिराशेकसण विशेषसरबतसुकी भाजीसूपहळद मिरची लोणचेहिरवा रस्साहोळी
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.