चटपटीत अशी कोशिंबीर – Koshimbir Recipe

0 views

चटपटीत अशी कोशिंबीर – Koshimbir

जेवणाची चव वाढवणारी चटपटीत कोशिंबीर

अगदी सोप्या पद्धतीने बनवा चमचमीत कोशिंबीर

रोजच्या जेवणासोबत बनवा अशी स्वादिष्ट कोशिंबीर!

भाजीपेक्षाही भारी लागते ही कोशिंबीर!


प्रस्तावना/ Introduction::

कोशिंबीर ही जेवणाआधी सॅलड म्हणून खाण्यासाठी अत्यंत उपयोगी असते जेणेकरून आपली पाचनक्षमता चांगली करण्यासाठी कोशिंबिरीचा वापर केला जातो…..

त्यामुळे आपण जेवणामध्ये सॅलड किंवा कोशिंबिरीचा वापर नक्की करावा…..

कोशिंबीर या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात….


साहित्य/Ingredients::

एक कांदा दोन काकड्या तीन टोमॅटो एक पेरू (जाम) एक हिरवी मिरची एक मोठी वाटी घट्ट दही एक मोठा चमचा पिठीसाखर एक चमचा काळ मीठ पाव चमचा सेंधव मीठ वरून थोडे भुरभुरण्यात चिली फ्लेक्स


कृती Procedure:::

चला तर मग कोशिंबिरीची तयारी करूया…

कोशिंबीर तयार करत असताना सर्वप्रथम काकडे सोलून घ्याव्या आणि अगदी बारीक चिरून घ्याव्या…

त्यानंतर टोमॅटो धुवून बारीक चिरून घ्यावे…

तसेच कांदा सोलून एकदम बारीक चिरून घ्यावा…

पेरू दोन त्याची साल काढली तरी चालेल आणि साल न काढताच तसाही बारीक चिरला तरी चालेल पेरू मधील जर बिया जास्त असल्यास त्या तुम्ही थोड्या काढून घेऊ शकतात…

काही बिया राहू दिला तरी काही प्रॉब्लेम नाही…

त्यानंतर मिरचीचे सुद्धा एकदम बारीक असे काप करून घ्या….

एका मोठ्या बाऊलमध्ये दही घाला दही घातल्यानंतर त्यामध्ये एक चमचा पिठीसाखर एक चमचा काळी मीठ पाव चमचा सेंधव मीठ घालून दही छान असे घट्टसर फेटून घ्या…

दही फेटल्यामुळे दह्याला पाणी सुटेल आणि साखरेचे सुद्धा पाणी होईल आणि दही थोडे पातळ होईल…. दही भेटत असताना विसकरच्या साह्याने फेटा….

त्यानंतर आपण सर्व जे सॅलड चिरलेले आहे जसे की काकडी टोमॅटो, कांदा, मिरची, पेरू हे सर्व साहित्य त्यामध्ये एकत्रित करा….

आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्या आपली छान थंडगार अशी कोशिंबीर तयार झालेली असेल…

इथे मी घरच्याच दह्याचा वापर केलेला आहे घरीच तयार केलेले दही वापरल्यास चव एकदम अप्रतिम लागते मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये दही कसे तयार करायचे हे तुम्हाला दाखवले आहे सोबतच खाली तुम्हाला लिंक सुद्धा देणार आहे….

आता आपल्या कोशिंबिरीवर चिली फ्लेक्स भुरभुरवा….

तुम्हाला अजून चटपटीत चव हवी असल्यास तुम्ही वरून चाट मसाला सुद्धा घेऊ शकतात….

तुम्ही अशी कोशिंबीर कधी दही मधील केली आहे का????
ही कोशिंबीर शक्यतोवर सकाळी किंवा दुपारच्या जेवणात खावी रात्रीच्या जेवणात खाऊ नये….

कारण असे म्हणतात की रात्रीच्या जेवणामध्ये दह्याचा वापर करू नये….

म्हणून ही कोशिंबीर दुपारच्या जेवणात किंवा सकाळी नाश्त्याला तुम्ही खाऊ शकता…..

यामध्ये तुम्ही डाळिंबीचे दाणे सुद्धा वापरू शकतात इथे माझ्याकडे डाळिंब नसल्यामुळे मी डाळिंबाचे दाण्यांचा वापर केलेला नाही डाळिंबाचे दाणे घातल्यानंतर एकदमच अप्रतिम अशी कोशिंबीर लागते…..

चला तर मग आपण एन्जॉय करूया कोशिंबीर….


टिप्स/Tips:::

कोशिंबीर तयार करत असताना तुम्हाला घट्ट दह्याचाच वापर इथे करायचा आहे कारण आपण साखर बीट घातल्यानंतर दही ला पाणी सुटते त्यामुळे आपले दही आपोआपच पातळ होते…. छान अशी कोशिंबीर अगदी पौष्टिक असते त्यामुळे आपल्या मुलांना नक्की द्यावे…. कारण मुलं अशी सॅलेड खात नाही त्यामुळे कोशिंबीर अगदी चवीने खातील कारण गोड चटपटीत अशा चवीची कोशिंबीर लहान मुलांना लगेच आवडेल….


वेळ आणि परिमाण Time and Quantity:::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ:::३० मिनिटे
परिमाण:::५ व्यक्ती साठी

टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords:::

#Koshimbir #KoshimbirRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #ChatpatiKoshimbir #IndianSalad #HealthyRecipe #QuickRecipe #EasyRecipe #TraditionalFood


चटपटीत अशी कोशिंबीर – Koshimbir Recipe

Anarase Pith Anarsa Flour Anarsa Pith Anarsa Preparation Anarsa Recipe DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Sweets Indian Traditional Sweets JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
आईसक्रीमइतरउडीपीउपवासउपवास पापडउपवास विशेषऋतु नुसारकिलबिलकेककैरी लोणचेकोजागिरीखान्देश विशेषगणेश चतुर्थीगुजरातीगोडगोडवाचटणी-कोशिबीरचटर पटरचायनीजझटपट (फास्ट फूड)झणझणीत-मसालेदारतांबडा रस्सादिवाळी फराळनानकटाईन्याहरीपंजाबीपराठा / भाकरीपापडपेयप्रादेशिकबर्फीबेकरीमकरसंक्रातीमसालेदारमहाराष्ट्रीयनमुंबई स्पेशलरस्सा भाजीलस्सीलाडूलिंबू लोणचेलोणचेवर्षभर साठवणूक चटपटीतशिराशेकसण विशेषसरबतसुकी भाजीसूपहळद मिरची लोणचेहिरवा रस्साहोळी
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.