बेरी पासून तयार होणारा कलाकंद

बेरी पासून तयार होणारा कलाकंद
प्रस्तावना:::
घरामध्ये दूध तर सर्वांच्याच असते आणि प्रत्येक जण त्याची साय काढत असतो… त्यापासून तू बनवत असतो ज्याला आपण गावराणी तूप म्हणतो आणि… अत्यंत सुगंध देणाऱ्याचे गावराणी तूप आणि तूप तयार करत असताना शिल्लक राहणारी बेरी त्याचे काय करायचे.. सर्वजण की बाहेर टाकून देतात.. पण त्यापासून अत्यंत चविष्ट असा पदार्थ तयार होतो…
साहित्य::

- एक मोठी वाटी बेरी
- अर्धी वाटी गूळ
- एक वाटी दूध
- एक ते दोन वेलदोडे
कृती::
एक वाटी च्या आसपास आपण बेरी घेऊ बेरी सर्वप्रथम कढई गरम करून सर्व काढून घेऊ… त्यानंतर त्यामध्ये एक वाटी इतके दूध घालू आणि अर्धी वाटी इतका गूळ घालू…

दूध आणि गूळ आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजू द्यायचे आहे… जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत सतत मिश्रण ढवळत राहायचे आहे…
त्यानंतर त्याला घट्टपणा आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे… मी इथे एक वाटी दुधाचा वापर केला आहे…

इथे तुम्ही दोन वाटी दुधाचा सुद्धा वापर करायचा करू शकतात परंतु दूध आठवण्यास थोडा वेळ लागेल मात्र चव एकदम आणखीन उत्तम लागेल…
यामध्ये वेलदोडे घालायचे आहे.. मी तुपामध्ये ऑलरेडी वेलदोडा घातलेला असल्यामुळे मी या मिश्रणामध्ये वेगळा असा वेलदोडा घालणार नाही…

तुम्ही तूप करत असताना वेलदोडा घातला नसेल तर तुम्ही इथे एक किंवा दोन वेलदोड्याची पूड घालू शकता…
आता हे आटलेले मिश्रण आपल्याला एका वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे… त्यानंतर फ्रीजमध्ये अर्धा ते एक तास सेट होण्यासाठी ठेवायचे आहे…

अर्धा ते एक तास झाल्यानंतर आपला कलाकंद सेट झालेला असेल… आता हा कलाकंद डिश उलटी करून काढून घ्या… आणि त्याच्या छान स्लाईस पाडा… चवदार असा गावराणी तुपाचा कलाकंद तयार झालेला आहे….

टिप्स::
दूध आठवताना गॅसचे आज मंद ठेवा नाहीतर मला पण जळून जाईल आणि जळकट चव लागेल…
वेळ व परिमाण
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::२० मिनिटे
