गुळाची गव्हापासून तयार केलेली थुली

by Vaishali Chaudhari
1 views

गुळाची गव्हापासून तयार केलेली थुली


प्रस्तावना:::

गव्हापासून तयार केले जाणारे पदार्थ या अत्यंत उत्कृष्ट असतात…. आणि मैदा मुक्त असे असतात… आणि घरातल्या जाड गव्हाच्या रव्यापासून तयार केल्या जाणारे अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असतात…


साहित्य:::

  • एक वाटीथुली
  • एक वाटी किसलेला गूळ
  • दोन चमचे साजूक तूप
  • दोन इलायची
  • चार ते पाच काजू बदाम ची कूट
  • आठ ते दहा मनुका


कृती:::

गव्हाची थुली म्हणजेच चक्की वरून अगदी जाडसर आपल्याला एका गावाचे साधारण पाच सहा तुकडे असे करून आणायचे आहे आणि ते गाळून घ्यायचे आहे ……

फक्त आपल्याला एकदम जाड रवा यातील वापरायचा आहे त्याला धुली असे म्हणतात…

आता एक वाटी किसलेला गूळ एका पातेल्यामध्ये घालून त्यात एक ग्लास पाणी घालावे आणि गूळ वितळेपर्यंत विरघळून घ्यावा आणि उकळी आली की गॅस बंद करावा…

. आता गुळाचे पाणी गाळून घ्या…. काजू आणि बदाम चे चांगले तुकडे करून घ्या दोन वेलचीची पूड करून घ्या….

सर्वप्रथम एका कढईमध्ये दोन चमचे इतके तूप घाला… त्यामध्ये थोडे काजूचे तुकडे घाला आणि मनुका घाला आणि मनुका फुलल्या नंतर त्यामध्ये गव्हाचा जाडसर रवा भाजून घ्या….

गव्हाचा रवा चांगला तांबूस रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या… आता त्यामध्ये गळलेल्या गुळाचे पाणी घाला…

आणि त्यावर झाकण ठेवून साधारण चार ते पाच मिनिटे चांगली वाफ येऊ द्या… अधून मधून हे मिश्रण ढवळत घ्या….

त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड घाला आणि पुन्हा मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या… आता पुन्हा एक ते दोन वाघ काढून घ्या आणि गॅसची आच मंदच ठेवावी…

वाफ निघाल्यानंतर गॅस बंद करा आणि त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे तसेच राहू द्या… त्यानंतर झाकण उघडून त्यावर पुन्हा उरलेले काजू बदाम चे तुकडे घाला….

आपली गरमागरम थुली तयार आहे.. ही तुम्ही गणपतीत नैवेद्यासाठी देवयांमध्ये नैवेद्यासाठी आणि चतुर्थी अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ बनवू शकता….

हा पदार्थ अत्यंत रुचकर लागतो…..


टिप्स:::

थुली आपण गॅसवर दहा ते पंधरा मिनिटे चांगली शिजवली आहे कारण थुली शिजण्यास वेळ लागतो…. ती अगदी मंद आचेवर शिजवायची आहे आणि अधून मधून सतत ढवळत राहायची आहे…..


वेळ आणि परिमाण:::


तयारीची वेळ::१०मिनिटे
एकूण वेळ:::३० मिनिटे
परिमाण:: दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11467

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.