चकली 

भाजणीची कुरकुरीत अशी चकली!!! Bhajani Chakli


प्रस्तावना/Introduction::::

भाजणीची चकली म्हटलं की सगळ्यांना तोंडाला पाणी सुटते…. परंतु ही चकली बनवत असताना बऱ्याच अशा अडचणी येतात कधी चकली खूप कडक होऊन जाते तर कधी चकली दाताने तुटतच नाही…

चकली 

तर कधी रबऱ्यासारखी वातळ होते…. याची योग्य प्रमाण काय आहे आणि ती कुरकुरीत कशी होईल याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या रेसिपी मध्ये सांगणार आहे…. आजची मजा आजीच्या हाताची चव मी तुम्हाला सांगणार आहे….


साहित्य/Ingredients:::

चकली  – फोटो 2
  • 400 ग्राम तांदूळ
  • दोनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ
  • 100 ग्रॅम उडदाची डाळ
  • 100 ग्रॅम पोहे
  • 50 ग्रॅम साबुदाणा
  • 50 ग्रॅम धने
  • 50 ग्रॅम जिरे
  • दोन चमचे तिखट
  • एक चमचा हळद
  • दोन चमचे तीळ
  • दोन चमचे ओवा
  • 50 ग्रॅम मीठ
  • तळण्यासाठी तेल


कृती/ Procedures:::


सर्वप्रथम चकली तयार करण्यासाठी त्याची भाजणी तयार करून घ्यावी लागते भाजणी तयार करत असताना तांदूळ हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ हे सर्व साहित्य धुवून घ्यावे आणि वेगवेगळे वाळत घालावे त्यानंतर चांगले खरपूस भाजून घ्यावे ….

त्यानंतर हे साहित्य भाजल्यानंतर त्यात धने आणि जिरे सुद्धा भाजावे आणि हे पिठाच्या गिरणीवरून दळून आणावे…. ही झाली आपली चकलीची भाजणी तयार!!!!!


चकली ची कृती/ Preparation of Chakli:::

चकली तयार करण्यासाठी सर्वप्रथम मेजरींग कपाने दीड कप भाजणी पीठ त्यासाठी एक कप पाणी घ्या…. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये एक कप इतके पाणी घ्या त्याला चांगल्या उकड्या येऊ द्या….

चकली  – फोटो 3

उकळल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे ओवा दोन चमचे तीळ दोन चमचे तिखट एक चमचा मीठ पाव चमचा हळद हे सर्व साहित्य घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या पाण्याला चांगल्या उकळी आल्यानंतर एक चमचा तेल घाला…..

चकली  – फोटो 4

तेल घातल्यानंतर पाण्याला उकळी आली की मग त्यामध्ये दीड कप इतके भाजणीचे पीठ घाला…. आणि लाटण्याच्या साह्याने चांगले पीठ घोटून घ्या ज्याप्रमाणे आपण खिशी घालतो त्याप्रमाणे खिशी घालून घ्या….

चकली  – फोटो 5

गॅस लगेच बंद करा… ही चकलीचे मिश्रण साधारण दहा मिनिटे चांगले झाकून ठेवा म्हणजे ते चांगले वाफवून जाईल… गॅस आपण बंद केलेला आहे….

चकली  – फोटो 6

दहा मिनिटे झाली की लगेच हे मिश्रण पराती मध्ये काढा आणि थंड पाण्याचा हात घेऊन हे मिश्रण चांगले मळून घ्या इथे तुम्ही गरम पाण्याचा सुद्धा वापर करू शकतात थंड पाण्याचा केला तरी चालेल …….

चकली  – फोटो 7

मिश्रण मात्र एकदम मऊ असे करायचे आहे जेणेकरून आपली चकली तुटणार नाही…. हे मिश्रण एकदम मऊ केल्यानंतर आपल्या चकलीच्या साच्यामध्ये भाजणीचे पीठ भरून घ्या….

आणि एका ताटामध्ये चकल्या पाडून घ्या…. आता एका कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम करा आणि गॅस मंद करा…. त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच चकल्या घाला….

चकली  – फोटो 8

आणि सात मिनिटे जवळपास दोघं बाजूंनी चांगल्या तळून घ्या… याच पद्धतीने सर्व मिश्रणाच्या चकल्या आधी पाडून घ्या आणि मग चार ते पाच तेलात घालून त्या व्यवस्थित तळून घ्या…

चकली  – फोटो 9

चकल्या तळत असताना सुरुवातीला गॅसची आच मंद ठेवायची आहे त्यानंतर गॅसची आच मोठी करायची आहे साधारण पाच ते सात मिनिटे एक लॉट तळण्यासाठी वेळ लागतो….

चकली  – फोटो 10

कारण चकली कच्ची ही राहू नये कच्ची राहिल्यामुळे ती वातड होऊ शकते आणि जास्त तळल्यामुळे कडकही होऊ शकते म्हणून पाच मिनिटे तळून झाल्यानंतर लगेचच चकली काढून घ्यावी…..

आपल्या खमंग कुरकुरीत अशा चकल्या तयार होतील आणि त्या तेलकट ही जास्त होणार नाही…. छान अशी कुरकुरीत भाजणीची चकली तयार झालेली आहे अगदी सोपी पद्धत मी इथे तुम्हाला सांगितलेली आहे…

इथे आपल्याला गॅसवर ठेवून खिशी घालायची नाही पाण्यामध्ये पीठ मिक्स केल्यानंतर लगेचच खाली उतरवून दहा मिनिटे मिश्रण झाकून ठेवायचे आहे….

बघा किती छान तुमच्या कुरकुरीत अशा चकल्या तयार होतील…. तर आपण एन्जॉय करूया गरमागरम कुरकुरीत अशी भाजणी चकली!!!


टिप्स/Tips:::

भाजणीचे पीठ मळताना एकदम चांगले एकजीव करा नाहीतर चकली पाडत असताना त्याचे तुकडे होतील त्यामुळे भाजणीचा गोळा चांगला मळून घ्या…. आणि खिशी घातल्यानंतर दहा मिनिटे झाकण ठेवून चांगले वाफ येऊ द्या गॅस मात्र बंद ठेवलेला आहे…..


वेळ आणि परिमाण Time and Quantity::

तयारीची वेळ:: २०मिनिटे
एकूण वेळ:: ६०मिनिटे
परिमाण::पाव किलो चकली
टॅग्स/ Tags::

भाजणी पीठ रेसिपी

You may also like

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
आईसक्रीमइतरउडीपीउपवासउपवास पापडउपवास विशेषऋतु नुसारकिलबिलकेककैरी लोणचेकोजागिरीखान्देश विशेषगणेश चतुर्थीगुजरातीगोडगोडवाचटणी-कोशिबीरचटर पटरचायनीजझटपट (फास्ट फूड)झणझणीत-मसालेदारतांबडा रस्सादिवाळी फराळनानकटाईन्याहरीपंजाबीपराठा / भाकरीपापडपेयप्रादेशिकबर्फीबेकरीमकरसंक्रातीमसालेदारमहाराष्ट्रीयनमुंबई स्पेशलरस्सा भाजीलस्सीलाडूलिंबू लोणचेलोणचेवर्षभर साठवणूक चटपटीतशिराशेकसण विशेषसरबतसुकी भाजीसूपहळद मिरची लोणचेहिरवा रस्साहोळी
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.