मँगो शेक

by Vaishali Chaudhari
0 views

मँगो शेक


प्रस्तावना:::

मँगो शेक हा सगळ्यांचा आवडतीचा विषय आहे… उन्हाळा आला की वेगवेगळ्या प्रकारची आंबे विक्रीसाठी येतात… जशी की केसर हापूस देवगड हापूस लालबाग अशी वेगवेगळ्या प्रकारची आंबे बाजारामध्ये येतात… आता आपण हापूस आंब्याचा मँगो शेक बघणार आहे…


साहित्य::

  • दोन हापूस आंबे
  • एक वाटी दूध
  • दोन चमचे साखर
  • अर्धा चमचा चिया सीड्स गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या


कृती:::

आंबे व्यवस्थित धुऊन घ्या…आंबे चांगले शीलणि च्या साह्याने सोलून घ्या…. आंबे सोडल्यानंतर घर चौकोनी अकबरामध्ये कापून घ्या…

म्हणजेच त्या घराचे तुकडे करा… त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कापलेले आंब्याचे काप घालू…

आणि मिक्सर मधून एकदम बारीक पेस्ट करू…. त्यानंतर त्यामध्ये एक ते दीड वाटी दूध घालू आणि दोन चमचे साखर घालू…

आणि एकदम बारीक फिरवून घेऊ… त्यानंतर ही पेस्ट काढल्यानंतर एका ग्लासमध्ये घालू…. त्यानंतर ज्यावेळेस आपण आंबा सोलतो …..

त्यावेळेसच आपल्याला थोडे आंब्याचे काप राहू द्यायचे आहे आपण ते गार्निशिंगसाठी वापरणार आहे…. त्यानंतर ग्लासामध्ये शेक काढल्यानंतर त्यामध्ये चिया सीड्स घाला…

त्यानंतर चार ते पाच आईस क्यूब घाला… त्यानंतर त्यामध्ये आंब्याचे काप घाला… आणि अजून एक गोल चकती ग्लासाला लावा..

आपला थंडगार असा मॅंगो शेक तयार झालेला आहे… तर एन्जॉय करूया उन्हाळ्यामध्ये थंडगार असा मँगो शेक….

यामध्ये तुम्ही मॅंगो आईस्क्रीम सुद्धा वरून घालू शकतात… एन्जॉय करा थंडा थंडा मँगो शेक….


टिप्स :::

आपण इथे आंबा सोलून त्याचे काप करून मग मिक्सरमध्ये फिरवले आहे… इथे तुम्ही आंबा सोडून त्यातला रस सुद्धा काढून त्यामध्ये दूध घालून आंब्याचा शेक बनवू शकतात… पण आपण आंबा सोडल्यामुळे त्यातला थोडाही घर वाया जात नाही म्हणून इथे सोलून आंब्याचा शेक बनवलेला आहे…


वेळ व परिमाण
तयारीची वेळ :१०मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण: दोन व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8348

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.