बदाम शेक
प्रस्तावना:::
बदाम शेक म्हटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते….. बदाम शेक ची रेसिपी एकदम सोपी आहे…. आणि उन्हाळ्यात थंड पेय म्हणून पिण्यासाठी मुलांना करून द्यायला आणि मुलांना खूप आवडते….
साहित्य:::
- एक लिटर फुल क्रीम दूध
- अर्धी वाटी बदाम
- अर्धी वाटी साखर
- दोन फुलं चम्मच कस्टर्ड पावडर

कृती:::
एक लिटर दूध दूध गरम करून घ्या… पूर्णपणे दूध टाकून घ्या.. एका वाटीमध्ये कस्टर्ड पावडर घालून त्यात अर्धी वाटी दूध घाला …………….

आणि व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्या…. बदामाचे तुकडे करून घ्या… किंवा बदामाचे काप सुद्धा तुम्ही करून घेऊ शकतात….

दूध पूर्णपणे तापून झाल्यानंतर त्यामध्ये साखर घाला… अर्धी वाटी घातलेले आहेत… काय आमच्याकडे कमी गोडआवडते…
तुम्हाला साखर कमी वाटत असल्यास तुम्ही एक लिटरला एक वाटी साखर घालू शकतो….. आता साखर घातल्यानंतर साखर पूर्णपणे विरघळून घ्या…….
आणि सारखं दूध ढवळत रहा… काय म्हणतात कस्टर्ड पावडरचे गोल त्यामध्ये मिक्स करून घ्या.,.. लगेच मिश्रण मिक्स करायचे आहे…..

नाहीतर कस्टर्ड पावडर च्या गाठी होऊ शकतात….. दूध सतत ढवळत राहायचे आहे…. ही पेस्ट एकदम घट्ट करायचे नाही घट्ट जर झाली तर अजून तुम्ही अर्धी वाटी त्यामध्ये दूध घालू शकता…
टोटल एक वाटी दूध मध्ये सुद्धा तुम्ही कस्टर्ड पावडर एकत्र घेऊ शकता…. त्यामुळे गाठी होणार नाही…. आता याला चांगल्या दोन ते तीन उकळ्या येऊ द्या….
आपले दूध चांगले घट्ट झालेले असेल… यामध्ये तुम्ही चार ते पाच केसरच्या काड्या घालू शकतात….. यामुळे दुधाला छान केसरी रंग येतो….
नाही घातले तरी चालेल….. कस्टर्ड पावडर मुळे असाही त्याला रंग येतो… पण केसर चा फ्लेवर छान लागतो…..

दोन-तीन उकळ्या आल्यानंतर त्यामध्ये बदामाचे काप घाला., बदामाचे तुकडे घाला… बदाम शिक साधारण दोन ते तीन तासासाठी थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा…..
त्यानंतर ग्लासामध्ये तुम्ही बदाम शेक सर्व्ह करू शकतात… तर एन्जॉय करूया थंडगार बदाम शेक…….

टिप्स:::
दुधामध्ये कस्टर्ड पावडर चे घोल घातल्यानंतर सतत दूध ढवळत रहा… लगेचच ढवळा… नाहीतर कस्टर्ड पावडरच्या गाठी तयार होती….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ:३० मिनिटे
परिमाण ::तीन व्यक्तींसाठी
