Holi Special | Thandai Recipe – होली स्पेशल ठंडाई |होळी स्पेशल

by Vaishali Chaudhari
113 views

होळी स्पेशल थंडाई

Holi Special | Thandai Recipe – होली स्पेशल ठंडाई |होळी स्पेशल

प्रस्तावना:::

होळीमध्ये पिली जाणारी थंडाई हे शीतपेय सर्वांनाच आवडते.. होळीमध्ये यामध्ये बऱ्याच ठिकाणी भांग मिक्स केली जाते हे उत्तर प्रदेशातील फेमस असं शीतपेय आहे….. आपण इथे भाग न मिक्स करतात थंडाई बनवणार आहे….

Holi Special | Thandai Recipe – होली स्पेशल ठंडाई |होळी स्पेशल – फोटो 2


साहित्य::

  • एक लहान वाटी बदाम (२ टेबल स्पून १२)
  • एक लहान वाटी काजू (१ १/२टेबल स्पून ८)
  • मेलन सीड( १ १/२ टेबल स्पून)
  • १ चमचा शोप
  • २ टेबल स्पून खसखस
  • दहा ते बारा सहा हिरवे वेलदोडे साबूत
  • अर्धी वाटी गुलाब पाकळ्या
  • एक मोठा खडा खडीसाखरेचा
  • एक ग्लास दूध
Holi Special | Thandai Recipe – होली स्पेशल ठंडाई |होळी स्पेशल – फोटो 3


कृती:::


सर्वप्रथम खडीसाखर खलबत्त्यामध्ये कुटून घ्यावी.. नाहीतर मिक्सर चे भांडे खराब होते.. खडीसाखर डायरेक्ट मिक्सरमध्ये बारीक होत नाही…

मिक्सरच्या भांड्यामध्ये खडीसाखर पावडर काजू बदाम मिलन सीड खसखस शोप मिरे, हिरवे वेलदोडे गुलाबाच्या पाकळ्या घालाव्या….

हिरवे वेलदोडे हे अख्खेच घालावे… त्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरतो…. आता हे मिश्रण हळूहळू मिक्सरमध्ये बारीक करावे….

त्याची एकदम बारीक सर फूड करावी.. ही पुढचा आणि च्या साह्याने गाळून घ्यावी… चाळल्यानंतर बारीक पावडर तयार होईल…

त्याची बारीक पूड झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा गुलाबाची पाने लांब काप करून घालावी.. त्यानंतर यामध्ये केशराच्या काड्या घालाव्या आणि मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे…

आपला थंडाई मसाला आता तयार झालेला आहे…

Holi Special | Thandai Recipe – होली स्पेशल ठंडाई |होळी स्पेशल – फोटो 4


एका ग्लासमध्ये दूध घेऊन एक ते दीड चमचा थंडाई मसाला घालावा.. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आपली थंडाई तयार झालेली आहे…

आपल्याला जर गोड आवडत असल्यास तुम्ही दुधामध्ये अजून थोडी साखर घालू शकतात…. आपली थंडाई लगेचच तयार होईल..

ही थंडाई आपण थंड दुधामध्ये केलेली आहे… या पावडरीचा वापर तुम्ही दूध गरम करून त्यामध्ये दीड चमचा थंडाई पावडर घालून एक उकळी आणून गॅस बंद करा.

आपली थंडाई तयार झाली आहे या पद्धतीने सुद्धा थंडाई केली जाते… थंड दुधामध्ये थंडाई पावडर अत्यंत छान लागते आणि ही थंडाई शरीर एकदम थंड ठेवते उन्हाळ्यामध्ये हे पेय पिले जाते…..

इथे तुमच्याकडे गुलाब पाकळ्या नसल्यास तुम्ही गुलकंदाचा सुद्धा वापर करू शकतात फक्त गुलकंद टाकताना ज्यावेळेस आपण दूध तयार करतो ….

त्यावेळेस एक चमचा गुलकंद घालावे आणि दीड चमचा थंडाई पावडर घालावी… चला तर आपली थंडीगार अशी थंडाई तयार झालेली आहे एन्जॉय……

होळीला आपण नक्की थांडायची रेसिपी करून बघा…. थंडी गार थंडाई……

टिप्स:::

थंडाई करताना आपल्याकडे गुलाबाच्या पाकळ्या जर नसतील तर त्याऐवजी आपण दुधामध्ये गुलकंद सुद्धा वापरू शकतो… इथे मी खडीसाखरेचा वापर केलेला आहे तुम्ही इथे खडीसाखर नसल्यास साखरेचा सुद्धा वापर करू शकतात साखर साधारण सहा चम्मच इतकी घालावी आणि पावडर करून घ्यावे…..


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ: १० मिनिट
एकूण वेळ १५ मिनिटे

You may also like

Leave a Comment

swaadgharcha.com swaadgharcha.comअन्न हे पूर्णब्रह्म
🍛 सर्व विभाग
❤️ सेव्ह केलेल्या रेसिपी

अजून काही सेव्ह केलेले नाही. आवडलेल्या रेसिपीवरील ♡ दाबा — नंतर इथे सहज सापडेल.