
कैरीचे थंडगार पन्ह आंबट आणि गोड थंडगार वाटणारे उन्हाळ्यामध्ये दिलासा देणारे
प्रस्तावना:::
उन्हाळ्यामध्ये अति ऊन असल्यामुळे आपल्याला काहीतरी थंडगार असे प्यावे असे वाटते… त्यात कैरीची कुठलीही रेसिपी म्हटली की सगळ्यांनाच आवडते त्यामुळे आपण आज कैरीचे थंडगार असे पणे पाहणार आहे… आपल्या आजीच्या काळामध्ये छान गुळाचे थंडगार असे पन्ह आपण प्यायचो….
साहित्य::

- तीन तोतापुरी कैरी
- दोन मोठ्या वाट्या गुड
- एक चमचा सेंधव मीठ
- एक चमचा काळे मीठ
कृती:::
सर्वप्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन घ्या.. त्याच्या आजूबाजूचा चिक सर्वात धुवून घ्या… त्यानंतर कैऱ्याची साल वेगळी करा…
त्यानंतर कैरीचे काप करून घ्या…. कैरीचे काप केले नंतर दोन ते तीन शिट्ट्यांवर कैऱ्या चांगल्या शिजवून घ्या… दोन ते तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा…
कुकर मधील वाफ निघाल्यानंतर मिश्रण रवीच्या सहाय्याने घोटून घ्या… किंवा थंड झाल्यावर तुम्ही हे मिश्रण मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकतात….
त्यानंतर गूळ कुठून घ्या गुळाचे पाणी करून घ्या… कैरीच्या मिश्रणामध्ये घाला… आता त्यामध्ये थंडगार असे पाणी घाला…

त्यानंतर यामध्ये एक चमचा सैंधव मीठ एक चमचा काळे मीठ… काळे मीठ कमी वाटत असल्यास तुम्ही दीड चमचा सुद्धा घालू शकता….
त्यानंतर हे मिश्रण मी इथे घट्टच ठेवलेले आहे… कारण साधारण अर्धा ग्लास इतके हे मिश्रण घालून त्यात अर्धा ग्लास इतके थंडगार पाणी घालावे आणि बर्फाचे दोन ते तीन तुकडे घाला…
आणि संध्याकाळी पन्ह प्यायला द्या… आपल्याला पुदिना आवडत असल्यास ज्या वेळेस आपण कैरीचा गर मिक्सरमधून फिरवतो त्यावेळेस थोडा पुदिना घालून तोही मिक्सरमधून फिरवून घ्यावा….
मी इथे पुदिन्याचा वापर केलेला नाही… पुदिना घातल्यास चवही छान लागते आणि पचनास चांगले होते….

हे मिश्रण घट्ट ठेवले तर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवण्यास सोपे जाते आपण ते मिश्रण एका बॉटलमध्ये भरून साधारण आठ दिवस त्याचा वापर करू शकतो… एक सरबत म्हणून सुद्धा आपण याचा वापर करू शकतो…
उन्हातून आल्यानंतर थंडगार असे पन्ह पिण्यास द्या…. आणि तुम्हाला दोन ते तीन दिवसात संपवायचे असल्यास तुम्ही त्यामध्ये अर्धा लिटर एवढे पाणी घालू शकतात…..

टिप्स:::
मी कैरीचे काप करून शिजवणे आहे तुम्ही अख्खी कैरी सुद्धा शिजवून घेऊ शकतात आणि नंतर त्याचा गर वेगळा करू शकतात…
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ:१०मिनिटे
एकूण वेळ: २०मिनिटे
परिमाण::१ लिटर
