थंडगार अशी मावा लस्सी
प्रस्तावना:::

उन्हाळा आला की थंडावा हवा त्यासाठी आपण थंडगार मावा लस्सीची तयारी करू….मावा लस्सी साठी मावा आईस्क्रीमचा किंवा मावा कुल्फीचा तुम्ही वापर करू शकता….
साहित्य:::

- एक वाटी दही
- दोन चमचे पिठीसाखर
- आणि एक मावा आईस्क्रीम स्कूप किंवा मावा कुल्फी
कृती:::
सर्वप्रथम घट्टसर दही घ्या… या दहीमध्ये आपण पाण्याचा वापर करणार नाही… पातेल्यामध्ये दही घातल्यानंतर विस्करच्या साह्याने लोणून घ्या …

दही विस्करच्या साह्याने दही लोणून घ्या… त्यामध्ये पिठीसाखर घाला आणि आईस्क्रीम घाला…
तुमच्याकडे थोडा मावा असल्यास तो सुद्धा त्यामध्ये घालून मिक्सरच्या साह्याने चांगला फेटून घ्या….
मावा नसल्यास मावा चा वापर नाही केला तरी चालेल मी इथे मावा दह्याच्या मिश्रणामध्ये घातलेला नाही…

मावा आईस्क्रीम चा वापर केलेला आहे…. दही चांगलं विसरच्या साह्याने चांगले फेटून घ्या…. आपली लस्सी तयार झाली आहे…
लस्सी ग्लासमध्ये काढून घ्या…. घातल्यानंतर त्यामध्ये आईस क्यूब घालून घ्या… त्यामध्ये मावा आईस्क्रीम घाला….

आपले मावा लस्सी आईस्क्रीम तयार झाली आहे… थंडगार मावा लस्सी आईस्क्रीम….
(लस्सी चे दही फेटताना तुमच्याकडे मावा असल्यास थोडा मावा घाला… मावा घातल्यानंतर विस्कर च्या सहाय्याने चांगले फेटून घ्या आणि वरून मावा आईस्क्रीम घाला…)
टिप्स:::
दही फेटताना त्यामध्ये पाण्याचा वापर करू नये दही घट्टसरच ठेवावी घट्टसर दह्याची लस्सी एकदम उत्तम चविष्ट लागते
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: १०मिनिटे
एकूण वेळ: ३०मिनिटे
परिमाण::१ग्लास
