जांभूळ शॉट
प्रस्तावना::
जांभळं आले की तोंडाला अगदी पाणी सुटते आणि यापासून काय नवनवीन रेसिपी बनवता येतील हा आपण विचार करतो किंवा असेही जांभळे खातो…. आणि चटपटीत असं जर आपल्याला त्यापासून एखादे ड्रिंक मिळाले तर किती छान!!!! तर आज आपण बघणार आहे जांभूळ शॉटची रेसिपी!!!!
साहित्य :

- एक पाव जांभळे
- एक चमचे साखर
- पाव चमचा सेंधव मीठ
- पाव चमचा काळे मीठ
- पाव चमचा पिंक रॉक सॉल्ट
- पाव चमचा चाट मसाला
- पाव चमचा तिखट
कृती:::
सर्वप्रथम जांभळे अत्यंत स्वच्छ धुवा आणि नंतर त्यामधून गर वेगळा करा.. सुरीच्या साह्याने याचे तुकडे तुकडे करून घ्या आणि बिया वेगळ्या करा…

आता हे जांभळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुदिन्याचे पाने घाला त्यामध्ये काळे मीठ साखर आणि थोडा चाट मसाला घाला आणि मिक्सरमध्ये बारीक एकदम पेस्ट करून घ्या……
आणि यामध्ये तीन ते चार आईस क्यूब टाका… मागे सांगितल्याप्रमाणे आईस क्यूब घातल्याने आपली प्युरी एकदम चांगली तयार होते आणि रंग तसाच असा राहतो….
तुम्हाला वाटत असल्यास यामध्ये थोडे थंडगार पाणी घाला… पण हे मिश्रण जास्त पातळ करू नये हे घट्टसरच ठेवावे…

आता आपल्याकडे छोटे कंटेनर असेल ते वापरू शकता किंवा छोटे ग्लास असतील ते तुम्ही वापरू शकता एका डिशमध्ये पिंक रॉक सॉल्ट आणि तिखट चाट मसाला एकत्र करून घ्या आणि ते पसरवून घ्या…
त्यानंतर वरती ग्लासाची किनार ओली करून त्याला मीठ आणि त्याचे मिश्रण लावा त्यामध्ये आपण तयार केलेली जांभळांची प्युरी घाला…

यानंतर जांभूळ शॉट वर पुदिन्याच्या पानाने सर्व करा आणि आता हा जांभूळ शॉट पिण्यास रेडी आहे…. आता आपण जो बाटलीला मसाला लावलेला आहे त्यामुळे आपल्याला टेस्ट एकदम छान लागेल….
आपला जांभूळ शॉट रेडी आहे…. तर एन्जॉय करूया जांभूळ शॉट!!!! जांभूळ शॉट एकदम लहान मुलांनाही आवडेल याचा तो चविष्ट लागतो!!!!

टिप्स:::
जांभूळ शॉट तयार करताना मोठे जांभूळचा वापर करावा आणि त्याचा गर वेगळा करा…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
