टरबुजाचा थंडगार असा ज्यूस
प्रस्तावना::
उन्हाळ्यामध्ये येणारे टरबूज हे फळ शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी असते.. त्यामध्ये आपली शरीराची पाण्याची कमतरता भरून निघते… त्यामुळे जास्तीत जास्त टरबूज हे फळ खाल्ले पाहिजे…
साहित्य…

दोन ते तीन तुकडे टरबुजाचे,
दोन चमचे पिठीसाखर
आईस क्यूब
कृती:::
प्रथम टरबूज कापून घ्या.. टरबूज हे पाण्यामध्ये ठेवून थंडगार करून घ्या….त्यामधील आतल्या बाजूतील गराचे दोन ते तीन तुकडे काढा….
गरामधील सर्व बिया काढून घ्या…. बियांचे बारीक क्रशर च्या साह्याने क्रश करून घ्या…. आता हा गर मिक्सरमध्ये घाला त्यामध्ये एक ते दोन चमचे पिठीसाखर घाला…

आणि कर चांगला चिकन होईपर्यंत मिक्सरमधून फिरवून घ्या…. आता हा ज्यूस ग्लासामध्ये घाला आणि त्यामध्ये स्ट्रॉ घालून प्यायला द्या….
त्यामध्ये तुम्ही आईस क्यूब घाला…. किंवा आपले टरबूजही थंड आपण करून घेतलेले आहे… नाही घातले तरी चालेल…

यामध्ये तुम्ही अर्धा ग्लास दुधाचा वापर करू शकता…. हे ड्रिंक सुद्धा खूप छान लागते…. आवडत असल्यास थोडे चिया सीड भिजत घालून त्या सुद्धा घाला…
थंडगार असे टरबुजाचे शीतपेय तयार झालेले आहे…. यामध्ये तुम्ही साखरेच्या ऐवजी खडीसाखरे कुटून घातली तरी चालेल….
यामध्ये थोडा चाट मसाला सुद्धा वापर कमी करू शकतात…. टरबूज असा ज्यूस आणखी चटपटीत लागेल…. आणि शुगर असेल त्यांच्यासाठी पिठीसाखर नाही घातले तरी चालेल…
फक्त टरबुजाचे काम मिक्सर मधून फिरवून घ्या… आणि आईस क्यब घालून ज्यूस त्यांना द्यावा….. या ज्यूस मध्ये तुम्ही क्रीम चा सुद्धा वापर करू शकतात…
मी इथे एकदम साध्या पद्धतीचा वापर केलेला आहे…. पण मी तुम्हाला अनेक पद्धती इथे सांगितलेल्या आहेत….
ज्या वेळेस आपण दूध घालतो त्या ऐवजी क्रीम घातली तरी चालेल… आणि आपण आईस क्यूब घालतो त्यामुळे त्यामध्ये पातळ होते…
थंडगार टरबूज तयार आहे….
टिप्स:::
टरबूजा मधील सर्व बिया काढून घ्याव्यात…
नाहीतर त्या मिक्सरच्या ज्यूस मध्ये वाटल्या जातील…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ: २० मिनिटे
परिमाण २ग्लास
