एग्ज रोल किंवा अंडा रोल
प्रस्तावना:::

मुलांना अंडी तर खूप आवडतात.. त्यापासून वेगवेगळ्या रेसिपी हव्या असतात…. आज आपण सोप्प आणि साधा असा एग्ज रोल बघणार आहे…
साहित्य:::

- ३ अंडे
- १ कांदा
- १टोमॅटो
- चार हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- चिमूटभर हळद
- चवीप्रमाणे मीठ
- चाट मसाला
- दोन चपात्या
- बटर
- तेल
कृती:::
कांदा सोलून बारीक चिरून घ्या…. टोमॅटो बारीक चिरून घ्या… मिरच्या बारीक चिरून घ्या….
अंडे फोडून घ्या…

त्यामध्ये चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो चिरलेल्या मिरच्या चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करा…..
चवीप्रमाणे मीठ घाला आणि चिमूटभर हळद घाला आणि फेटून घ्या…. तव्याला बटर लावून घ्या…
त्यावर अंड्याचे मी अर्धे मिश्रण घाला आणि ते पसरवून घ्या… लगेचच त्याला चपाती लावा…. म्हणजे ती चपाती अंडा रोल ला चिटकून जाईल….

दोघ बाजूने थोडे तेल सोडा आणि अंडा रोल भाजून घ्या…. खरपूस असा अंडा रोल भाजल्यानंतर एका डिशमध्ये काढा…

अंडा रोलवर टोमॅटो सॉस लावा आणि कांदा घालून त्याचा रोल तयार करा…. यावर तुम्ही चाट मसाला सुद्धा घालू शकतात ….


आवडीप्रमाणे तुमच्या सॉसेस सुद्धा घालू शकतात शेजवान सहज रेड चिली सॉस सुद्धा लावू शकतात… मी इथे टोमॅटो केचपचाच वापर केलेला आहे तसेच तुम्ही वरून ची सुद्धा घालू शकतात….

आता भरून कट करून घ्या… आपला एग्ज रोल तयार झालेला आहे… हा तुम्ही टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता…..
तर एन्जॉय करून या गरमागरम एग्ज रोल!!!!

टिप्स:::
अंड्याचे मिश्रण घातल्यावर लगेच चपाती घाला नाहीतर ती ऑमलेट ला चिकटणार नाही….
वेळ आणि परिमाण::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ:: २०मिनिटे
परिणाम::१ व्यक्तींसाठी
