मकीच्या बिबळ्यांच्या घाटाची पूर्वतयारी
प्रस्तावना::
घाटा कसा बनवायचा आहे मागच्या वेळेस मी दाखवलेलेच आहे पण आता मकीचा घाट्याची पूर्वतयारी कशी करायची… ते आपण बघून घेऊ… घाटाचे रवन कसे करायचे ते आपण बघू बाकी पुढची पद्धत सारखीच आहे…
साहित्य:::
दोन किलो मकी
दोन किलो गहू
दोन किलो तांदूळ
कृती::
सर्वप्रथम मकी निवडून घ्या आणि चक्की मधून चरमरं असे दळून आणा… चरमरे दळल्यानंतर ती गाळून घ्या….
दोन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ वेगवेगळ्या पातेल्यात किंवा बादली मध्ये भिजू घाला… साधारण तीन दिवस पूर्ण हे मिश्रण भिजू द्यायचे आहे..

चौथ्या दिवशी आपल्याला मक्याचे पीठ भिजू घालायचे आहे…. म्हणजे फक्त रात्रभर मक्याचे पीठ भिजेल…
चौथ्या दिवशी आदी गहू चांगल्या पाण्याने धुऊन घ्या…ज्याप्रमाणे आपण गव्हाचा चीक करतो त्याप्रमाणे गहू मिक्सरवर वाटा…..

किंवा ओल्या चक्की मधून वाटून आणा आणि गव्हाचा चीक गाळून घ्या…. दोन ते तीन पाण्यामधून गव्हाचा चिक गाळून घ्या…

आता हा चीक वेगळा ठेवा… तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या…त्यानंतर तांदूळ सुद्धा आपल्याला चरमरेध्ये दळून घ्यायचे आहे…..
दुसऱ्या दिवशी सकाळी हे तिन्ही रवण एकत्र करून घ्यावे… रवण्याच्या दुप्पट आपल्याला पाणी लागेल… आता आपले बिबळ्याचे रवण तयार झालेले आहे…
पुढील घाटा बनवण्याची पद्धत याआधी मी दाखवलेली आहे…
