ब्रेड क्रम्स

by Vaishali Chaudhari
0 views

ब्रेड क्रम्स


प्रस्तावना::

ब्रेडक्रम तयार करण्यासाठी आपण ब्रेडचा वापर करतो… आपण नेहमीच आपले ब्रेड शिल्लक राहतात.. या शिल्लक राहिलेल्या ब्रेड पासून आपण ब्रेडक्रम्स तयार करू शकतो जेणेकरून बऱ्याचश्या रेसिपींमध्ये आपल्याला त्याचा वापर करता येईल…


साहित्य::

दहा ते बारा कोरडे झालेले ब्रेड


कृती:::

कधी कधी आपण पावभाजी बनवतो पावभाजी चे लादी पाव शिल्लक राहतात यापासून सुद्धा आपण ब्रेडक्रम बनवू शकतो….

तसेच बऱ्याचदा स्लाईस पाव आपण आणतो स्लाईस पाव सुद्धा शिल्लक राहतात… स्लाईस पावडर इझीली तव्यावर गरम करून आपण त्याचा ब्रेडक्रम बनवू शकतो

आपले ब्रेड शिल्लक राहिल्यानंतर आपण ते सावलीमध्येच थोडे वाळवून घेऊ शकतो… किंवा ते पंख्यामध्ये वाळत घातल्यास ब्रेड हा कडक होतो…

किंवा तुम्ही पाच ते दहा मिनिटं तव्यावर दोन्ही साईडला मंद आचेवर दोघ बाजूंनी ब्रेड भाजून घेतल्यानंतर असा ब्रेडही कडक होतो…

आताही कडक झालेले ब्रेड आपल्याला खलबत्त्यामध्ये किंवा बडगीमध्ये चोरून घ्यायचे आहे… आपल्याला त्याचे बारीक सर चुरा करायचा आहे….

किंवा लहान लहान तुकडे करून मिक्सरमध्ये पावचे तुकडे फिरवून घ्यावे… याचे बारीक चुऱ्यामध्ये रुपांतर होईल…

आता हा बारीक चुरा म्हणजेच ब्रेडक्रम्स…. याचा पॅटीस तयार करण्यासाठी उपयोग होतो..

किंवा आपण ज्यावेळेस कटलेट करतो बाहेरच्या लेयरला लावण्यासाठी याचा उपयोग होतो यामुळे कटलेट आपले खमंग तयार होतात…

किंवा कुठल्याही प्रकारचे पॅटीस…. तसेच थीकनर म्हणून वापर करू शकतो… ज्यावेळेस आपण आईस्क्रीम बनवतो त्यावेळेस आपण दुधाला घट्टपणा येण्यासाठी या ब्रेडक्रम्स वापर करू शकतो…

किंवा बटाट्याचे ज्यावेळेस पॅटीस बनवतो त्यावेळेस आपले थोडे पाणीदार रवण तयार झाल्यास त्यामध्ये घट्टपणा येण्यासाठी सुद्धा आपण ब्रेडक्रम चा वापर करू शकतो…

ज्यावेळेस आपण रबडी करतो किंवा कुल्फी करतो त्यावेळेस सुद्धा ब्रेडक्रम्स थीकनर म्हणून घट्टपणा येण्यासाठी वापर करू शकतो…………….

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8068

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.