ओरिओ बिस्कीट मोदक

by Vaishali Chaudhari
5 views

ओरिओ बिस्कीट मोदक


प्रस्तावना:::

लहान मुलं घरात असली की त्यांना चॉकलेटच्या वस्तू खूप आवडतात… आणि आपले बाल गणेश त्यांनाही चॉकलेटच्या वस्तू खूप आवडतात त्यामुळे आपण आज बघणार आहे मुलांच्या आवडीचे असे ओरिओ बिस्कीट चे मोदक


साहित्य:::

  • दहा रुपयांचे ओरिओ बिस्कीट च्या2 पुडे
  • 20 ग्रॅम पिटी साखर
  • 20 ग्रॅम खोबरा कीस
  • आठ ते दहा काजू बदाम चे तुकडे
  • अर्धी वाटी दूध
  • आणि साजूक तूप


कृती:::

सर्वप्रथम बिस्कीटचे पुढे फोडून घ्या… हाताने त्याचे तुकडे करून घ्या… त्यातील मधला पांढरा भाग वेगळा करून घ्या…

त्यानंतर वरील बिस्किटांचे मिक्सरमध्ये बारीक असे पीठ फिरवून घ्या… मिक्सर मधून पीठ फिरवल्यानंतर त्यामध्ये एक एक चमचा दुधाचा घालून त्याचा व्यवस्थित गोळा करून घ्या…..

अगदी पातळही नको आणि अति घट्टही नको मध्यम असा मऊसर गोळा भिजवावा… त्यानंतर आपण आता यामध्ये सारण तयार करून घेऊया…

एका बाऊलमध्ये आपण जी ओरिओ बिस्कीट ची पांढरी क्रीम घातली आहे ती घालावी त्यानंतर त्यामध्ये खोबरा कीस घालावा….

त्यानंतर त्यामध्ये पिठीसाखर घालावी आणि काजू-बदामाचे काप घालावे आणि सर्व सारण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे…

त्यानंतर मोदकाच्या साच्याला तुपाचा हात लावून त्यामध्ये आपण ओरिओ बिस्कीट चा गोळा जो घातलेला आहे….

तो थोडा थोडा घालून त्यामध्ये गॅप ठेवून त्यामध्ये आपण खोबरा आणि ओरिओ बिस्किटाचे सारण भरावे…

त्यानंतर मोदक खालच्या साईडने बंद करावा आणि आपला छानसा ओरिओ बिस्कीट चा मोदक तयार झालेला आहे…

यावरून तुम्ही चॉकलेट सिरप किंवा डार्क मिळते चॉकलेट सुद्धा तुम्ही घालू शकता…. किंवा असाही ओरिओ मोदक सर करू शकतात.,…

टिप्स:::


ओरिओ बिस्कीट चा आधी तुकडे करून मग मिक्सरमध्ये फिरवा पटकन पीठ तयार होऊन आपल्याला भिजवण्यास गोळा पटकन तयार होईल…


वेळ व परिमाण::


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकुण वेळ:: ३०मिनिटे
परिमाण::११ मोदक

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

13357

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.