चॉकलेट खोबरा मोदक
प्रस्तावना::
मोदक ही खूप प्रकारची असतात.. मुलांना गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी रोजच एक नवीन प्रकार हवा असतो त्यासाठी अत्यंत चवदार असा हा मोदक तयार होतो…
साहित्य::
- 100 ग्रॅम खोबरा कीस
- 20 ग्रॅम किंवा दोन चमचे मिल्क पावडर
- 50 ग्रॅम पिठीसाखर
- 50 ग्रॅम कोको पावडर किंवा डार्क चॉकलेट
- अर्धी वाटी दूध
- साजूक तूप
कृती::
सर्वप्रथम आपण घरगुती किस वापरत असल्यास तो मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यावा…
एका बाऊलमध्ये खोबऱ्याचा कीस त्यानंतर मिल्क पावडर दोन चमचे 50 ग्रॅम पिठीसाखर कोको पावडर घालून मिश्रण एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्या……
त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दूध घालाआणि त्याचा गोळा तयार करून घ्या.. अजून गरज वाटत असल्यास एक चमचा करत दूध घाला …….
आणि छान असा आपला गोळा तयार करून घ्या….. किंवा इथे कोको पावडर चा वापर न करता मेल्टेड चॉकलेटचा वापर तुम्ही जर करत असल्यास गोळा करताना तुम्हाला कदाचित दुधाचा वापर करण्याची गरज पडणार नाही ….
मेल्टेड चॉकलेट मुळे सहज रीतीने गोळा तयार होईल… आणि गोळा व्यवस्थित एकत्र करून घ्या… त्यानंतर मोदकाच्या साच्याला साजूक तूप लावून घ्या…
आणि त्यामध्ये सारण भरा आणि मोदक तयार करा…. आपली सुंदर असे चॉकलेट खोबरा मोदक आता तयार झालेले आहे…..
दिसायला एकदम सुंदर आणि चवीला अप्रतिम चला तर मग एन्जॉय करूया आपण चॉकलेट खोबरा मोदक!!!!!
टिप्स:::
मोदक तयार करत असताना आपण कोको पावडर चा जर वापर केला त्या अशा वेळेस आपल्याला जास्त दुधाचा वापर करावा लागतो…. आणि जर आपण मेल्टेड चॉकलेट त्यामध्ये घातली तर दुधाचा वापर करावा लागणार नाही…
वेळ व परिमाण:::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::११ मोदक
