कोजागीरी स्पेशल मसाला दूध

by Vaishali Chaudhari
82 views

🥘 १. रेसिपीचं नाव

कोजागीरी स्पेशल मसाला दूध

📸 २. फोटो / फीचर्ड इमेज :

३. प्रस्तावना

मसाला दूध हा विषय सर्वांच्याच आवडीचा आहे नाना पासून मोठ्यापर्यंत मसाला दूध हे सर्वांना आवडते. कारण दुधामध्ये आपण जी काही काजू बदाम पिस्ते याचा वापर करतो त्यामुळे ते दूध अत्यंत रुचकर लागते. मसाला दूध हे आपण कोजागिरी पौर्णिमेला नाही तर केव्हाही बनवू शकतो.हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,

📝 ४. साहित्य (Ingredients)

  • २ लीटर,
  • १ वाटी साखर,
  • पाच वेलदोडे पूड,
  • १२ काजू
  • १२ बदाम,
  • मुंबई दुध मसाला,
  • केसर

🔥 ५. कृती (Steps)

दोन लिटर विकास गोल्ड चे दुध घ्या. किंवा तुम्हाला प्युअर चे दूध मिळाले तर ते घ्या. प्युअर दुधामुळे मसाला दूध ही घट्ट होते.


एक पितळी पातेले स्वच्छ धुऊन घ्या. त्यामध्ये आणलेले दूध घाला. आता हे पातेले गॅसवर मंद आचेवर सारखे ढवळत राहा.

दुधाला चांगली उकडी आली की दूध मंद आचेवर परतवत राहा. दूध परतवण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो.

दूध उतू येऊ नये म्हणून तुम्ही त्यामध्ये बशीचा वापर करू शकतात. बशी ही पालथी घालावी. बशी तळाशी जाते त्यामुळे दूध उतू येत नाही.

दुधाला चांगल्या आठ ते दहा उखड्या आल्यानंतर साधारण पंधरा मिनिटांनी त्यामध्ये तुम्ही एक वाटी साखर घाला.

इथे मी साखरेचे प्रमाण एक वाटी दिलेले आहे काहींना खूप गोड आवडते त्यामुळे तुम्ही दीड वाटी सुद्धा साखर घालू शकतात.

पाच वेलदोडे सोलून त्याची पूड करून घ्या. काजू बदाम याची बारीक पूड करून घ्या. साखरेनंतर वेलदोड्याची पूड काजू, बदामची पूड दुधामध्ये घाला व चांगले ढवळून घ्या.

त्यानंतर त्यामध्ये केसरच्या चार ते पाच काड्या घाला. सर्वात शेवटी आपण जो आणलेला मसाला असेल तो मसाला घाला.

मला इथे मुंबई मसाल्याची पुडी उपलब्ध झाली त्यामुळे मी ती घालत आहे. तुम्हाला जी पण मसाल्याची पुडी उपलब्ध होईल ती तुम्ही घालू शकतात.

किंवा तुम्हाला मसाल्याचा वापर करायचा नसेल तर घरातीलच काजू बदाम जास्त घालू शकतात. बाहेरच्या पुढे मध्ये रंग येण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केलेला असतो.

आपण केसर जास्त घातली की तो कलर मसाल्या दुधाला येतोच. तसेच आपण पिस्त्याची पूडही यामध्ये घालू शकतात.

येथे मी मसाल्याची पुडी घातल्यामुळे त्यातच पिस्त्याची पूड होती. म्हणून मी वेगळी असे काही घातले नाही.

चांगल्या दहा ते पंधरा उकड्या आल्यानंतर आपले दूध तयार झालेले आहे. हे दूध आपण शरदेच्या (शरद पौर्णिमे रात्री)चांदण्यात नैवेद्य दाखवून पिण्यास घ्यावे. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा.

ज्यावेळेस आपण चंद्रदेवतेला मसाला दुधाचा नैवेद्य अर्पण करतो. चंद्राची किरण दुधामध्ये पडल्यानंतर आणि चंद्राची पूजा केल्यानंतर आपण हा नैवेद्य ग्रहण करतो. आपण केलेले मसाला दूध चांदण्या मध्ये ठेवून आपण ग्लासामध्ये पिण्यास घेऊ शकतात. आपले मसाला दूध तयार आहे.

.(सर्व साहित्य मेझरींग कप व बाकी स्पून ने मेझर केलेले आहे)

💡६. टिप्स (Cooking Tips):

येथे मी पितळी पातेल्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे पितळी पातेले नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा दूध आटवू शकतात. फक्त भांडे चांगले स्वच्छ धुऊन घ्यावे जेणेकरून दूध फाटणार नाही.

🍽️ ७. सर्व्हिंग सुचना (Serving Suggestion)

दूध तुम्ही काचेच्या ग्लासामध्ये सर्व करू शकतात.

🕒 ८. वेळ व परिमाण

• तयारीची वेळ: १० मिनिटे
• शिजवण्याची वेळ: 25 मिनिटे
• एकूण वेळ: 3५ मिनिटे
• परिमाण: ५ जणांसाठी

❤️ ९. निष्कर्ष / लेखकाची टिप्पणी

हा पदार्थ आरोग्यदायी, झटपट आणि पारंपरिक चवीचा आहे. आठवड्याच्या शेवटी नक्की करून बघा!

📚 १०. टॅग्स / कीवर्ड्स

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

11635

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.