खोबरा मोदक
प्रस्तावना::
मोदक ही खूप प्रकारची असतात.. मुलांना गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी रोजच एक नवीन प्रकार हवा असतो त्यासाठी अत्यंत चवदार असा हा मोदक तयार होतो…
साहित्य::
- 100 ग्रॅम खोबरा कीस
- 30 ग्रॅम किंवा तीन चमचे मिल्क पावडर
- 50 ग्रॅम पिठीसाखर
- बदामाचे काप
- अर्धीवाटी दूध
- साजूक तूप
कृती::
सर्वप्रथम आपण घरगुती किस वापरत असल्यास तो मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यावा…
एका बाऊलमध्ये खोबऱ्याचा कीस त्यानंतर मिल्क पावडर तीन चमचे आणि 50 ग्रॅम पिठीसाखर घालून मिश्रण एकदम व्यवस्थित एकत्र करून घ्या…..
त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दूध घाला आणि त्याचा गोळा तयार करून घ्या.. अजून गरज वाटत असल्यास एक चमचा करत दूध घाला ….
आणि छान असा आपला गोळा तयार करून घ्या….. आणि गोळा व्यवस्थित एकत्र करून घ्या… त्यानंतर मोदकाच्या साच्याला साजूक तूप लावून घ्या…
आणि त्यामध्ये बदामाचे काप घालून त्यावर सारण भरा आणि मोदक तयार करा…. आपली सुंदर असे खोबरा मोदक आता तयार झालेले आहे….
दिसायला एकदम सुंदर आणि चवीला अप्रतिम चला तर मग एन्जॉय करूया आपण खोबरा मोदक!!!!!
टिप्स:::
मोदक तयार करत असताना आपण दुधाचा वापर केलेला आहे या ऐवजी तुम्ही मिल्कमेडचा सुद्धा वापर करू शकतात… दुधाचा वापर करावा लागणार नाही…
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::११ मोदक
