तुरीच्या दाण्यांची हिरवी भाजी ( घेंगा)

प्रस्तावना::
तुरीच्या दाण्याची भाजी ही सीजनल भाजी असून दाण्याची भाजी अत्यंत चवदार लागते. या भाजीमध्ये कांद्याचा वापर असल्यामुळे भाजी अत्यंत चवदार लागते.
साहित्य::

- एक वाटी तुरीचे दाणे
- एक कांदा चार हिरव्या मिरच्या
- आठ ते दहा लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा
- आठ ते दहा खोबऱ्याचे काप
- कोथिंबीर
- जिरे मोहरी
- हळद
- फोडणीसाठी तेल
- मीठ
- गरम मसाला
- पाणी
कृती::
तुरीचे दाणे सोलून घ्या. एक वाटी दाणे होतील इतके दाणे घ्या. तवा गरम करा त्यावर थोडे तेल घाला .
आणि तुरीचे दाणे पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून व्यवस्थित भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुरीचे दाणे घालून त्याचा जाडसर भरडा करून घ्या.
चटणीची कृती::
तवा गरम करून त्यावर हिरव्या मिरच्या भाजून घ्या कांदा चिरून घ्या आणि कांदाही चांगला काळपट तांबूस रंगावर भाजून घ्या.
खोबऱ्याचे आठ ते दहा काप भाजून घ्या. हे सर्व साहित्य भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा, भाजलेले खोबरे, भाजलेल्या मिरच्या घालून त्यामध्ये थोडे पाणी घाला आणि कोथिंबीर घाला याचे बारीक चटणी करून घ्या. आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे.

कढईमध्ये तेल गरम करा. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी घाला त्यामध्ये चटणी घाला .
चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतावा चटणी मध्ये पाव चमचा हळद पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धने पूड घाला.

चटणी चांगली तेल सुटेपर्यंत परतवा चटणी सतत मिक्स करत रहा चटणी ला तेल सुटले की त्यामध्ये तुरीच्या दाण्यांचा भरडा घाला.
त्यामध्ये साधारण दोन वाट्या गरम पाणी घाला. किंवा आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ज्या प्रमाणात पाहिजे.
त्याप्रमाणे आपण पाणी घालू शकतो म्हणजे भाजी किती पातळ हवी त्यानुसार पाणी घाला. आता भाजीला दोन ते तीन उकळ्या येऊ द्या .

त्यावर अर्धवट झाकण ठेवा. आता चवीप्रमाणे मीठ घाला भाजीला पुन्हा दोन ते तीन उकळ्या येऊ द्या आणि गॅस बंद करा.
आता आपली तुरीच्या दाण्यांचा घेंगा तयार झालेला आहे . ही भाजी तुम्ही पोळी किंवा ज्वारीची भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत खाऊ शकतात.

टिप्स::
यामध्ये भाजीच्या चटणी मध्ये घट्टपणा आणण्यासाठी तुम्ही दहा ते बारा शेंगदाण्याचा वापर करू शकतात.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:२० मिनिटे
एकूण वेळ:४० मिनिटे
परिमाण: २ व्यक्तींसाठी
