उत्तप्पा
प्रस्तावना:
उत्तप्पा हा दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ आहे त्यांच्या जेवणातील प्रमुख पदार्थ आहे.
साहित्य:-

- ३ वाट्या तांदूळ,
- दीड वाटी उडदाची डाळ,
- मीठ,
- चिमूटभर सोडा ,
- एक कांदा,
- एक टोमॅटो,
- जाड दोन हिरव्या मिरच्या,
- कोथिंबीर
- तेल
कृती:
तांदूळ व उडदाची डाळ रात्रभर भिजत घालावी. सकाळी तिला स्वच्छ धुऊन तिला बारीक वाटून घ्यावी.
सायंकाळी या रवणामध्ये मीठ आणि चिमूटभर सोडा घालावा.
नंतर या रवणामध्ये चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो चिरलेल्या जाड मिरच्या, चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे.
उत्तप्पाचे रावण तयार झाले आहे.
डोशाच्या तव्याला तेल लावून गोल उत्तप्पा काढावा.

हा उत्तप्पा खरपूस भाजून घ्यावा.
उत्तप्पा तयार झालेला आहे
उत्तपा खोबऱ्याच्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत तुम्ही खाऊ शकतात.

टिप्स:-
खोबऱ्याची चटणी मी इडलीच्या रेसिपी सोबत शेअर केलेली आहे.
वेळ व परिमाण:
भिजवण्यासाठी वेळ: ८ तास
तयारीची वेळ: २० मिनिटे
एकूण वेळ: १ तास
परिमाण: ४ जणांसाठी
