थंडी स्पेशल डिंकाचे लाडू

प्रस्तावना::
डिंकाचे लाडू हे आजीच्या बटव्यातली खास रेसिपी आहे. माझ्या आजी डिंकाचे लाडू साजूक तुपातले बनवून सर्वांना खाऊ घालायचे. आज आपण ती रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करणार आहोत.
साहित्य::

- ५०० ग्रॅम खोबरे
- ५०० ग्रॅम खारीक पावडर / गुळ खारीक पावडर
- ५०० ग्रॅम साजूकतूप
- २०० ग्रॅम बदाम
- २०० ग्रॅम काजू
- २०० ग्रॅम डिंक
- २०० ग्रॅम शिंगाडा पावडर
- २५० ग्रॅम पिठीसाखर
- १०० ग्रॅम मनुका
कृती::
प्रथम खोबऱ्याच्या वाट्या घेऊन खोबऱ्याचा किसून घ्यावा. किसलेला किस हा मिक्सर मध्ये बारीक फिरवून घ्यावा.
(इथे खोबऱ्याच्या वाट्या किसूनच किस तयार केलेला आहे कारण रेडिमेड किस वापरल्याने लाडूंची चव वेगळी लागते.)
खारीक पावडर मिक्सर मधून बारीक करून घ्यावी. बदामची जाडसर भरड करून घ्यावी. तसेच काजूची ही जाडसर भरड करून घ्यावी.
डिंक थोडा कुठून घ्यावा. त्यामुळे तो करण्यास सोपा जातो. आता एका पॅनमध्ये एक चमचा तूप घाला त्यामध्ये खोबरे चांगले तांबूस रंगावर परतून घ्या.
या पद्धतीने सर्व अर्धा किलो खोबरे परतून घ्या. ते का मिश्रण एका तगारी मध्ये काढा. आता एक चमचा तूप घाला आणि त्यामध्ये खारीक पावडर परतवून घ्या .
हे मिश्रण मंद आचेवर परतवावे. खारीक पावडर चे मिश्रण खोबऱ्याच्या तगरीतल्या मिश्रणात घाला. आता पुन्हा चार ते पाच चमचे तूप घाला.

त्यामध्ये शिंगाडा पावडर गोळा होईल तोपर्यंत परतवत राहा तुपाची गरज लागल्यात तुम्ही अजून तूप दोन ते तीन चमचे घालू शकतात.
तूप घातल्यानंतर साधारण पाच ते दहा मिनिटे मंद आचेवर हे मिश्रण परतवा जेणेकरून शिंगाळ्याच्या पिठाला तूप सुटेल.

तूप सुटले की मग समजावे मिश्रण तयार झाले. हे तयार झालेले मिश्रण खोबऱ्याच्या मिश्रणावर घाला. आता पुन्हा पॅनमध्ये एक चमचा तूप घाला.
त्यामध्ये बदाम आणि काजूचे भरड थोडे परतवून घ्या काजू बदामचे मिश्रण जास्त परतवून नका. काजू बदामचे भरड खोबऱ्याच्या मिश्रणावर घाला.
आता पुन्हा पॅनमध्ये एक चमचा तूप घाला. त्यामध्ये किसमिस परतून घ्या. किसमिस परतवल्यानंतर खोबऱ्याच्या मिश्रणावर घाला.
पॅनमध्ये डिंक तळण्यासाठी दहा ते बारा चम्मच तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडा साधारण एक चमचा डिंक घाला .
आणि त्याच्या लाह्या फुटेपर्यंत तो तळून घ्या. असे एक एक चम्मच घालून डिंक तळून घ्या. डिंकाच्या छान लाह्या तयार होतात.

त्यानंतर या तयार झालेल्या लाह्या एका डिशमध्ये काढा. खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये पिठीसाखर घाला.(या मिश्रणामध्ये मी पिठीसाखर चा वापर केलेला आहे .
(तुम्हाला गुळाचा वापर करायचा असल्यास तुम्ही 250 ग्रॅम गूळ पॅनमध्ये एक चमचा तूप घालून फक्त वितळवून घ्यावा त्याचा पाक करू नये. वितळल्यानंतर लाडूच्या मिश्रणामध्ये लगेच घालावे आणि मिक्स करून त्याचे लाडू वळावे गुळाचे लाडू ही चवीला छान लागतात.)
मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ज्या डिंकाच्या लाह्या घेतलेले आहेत त्या बारीक फिरवून घ्या आणि ते मिश्रण पातळ होईल हे मिश्रण खोबऱ्याच्या मिश्रणावर घाला.

असे करून बाकीचा डिंक मिक्सर मधून फिरवून घ्या. साधारण चार ते पाच चमचे इतका डिंक राहू द्या तो आपण मिश्रणामध्ये वरतून घालूया.
आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या… मिक्स केल्यानंतर त्याचा लाडू होतो का ते बघा. लाडू होत नसल्यास पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तूप वितळवून घ्या.
ते तूप लाडूच्या मिश्रणावर घाला. पुन्हा लाडू चे मिश्रण मिक्स करून घ्या आणि आता त्यामध्ये आपण शिल्लक ठेवलेल्या डिंकाच्या लाह्या घाला.
आणि या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. मिश्रण जसे जसे थंड होते लाडू वळण्यास त्रास होतो त्यासाठी तुम्ही थोडे तूप गरम करून त्यामध्ये घालू शकतात.
त्यामुळे लाडू पटकन वळतील. मिश्रण गरम असतानाच लाडू वळून घ्या म्हणजे लाडू वळायला सोपे जातील.

याप्रमाणे सर्व लाडू वळून घ्या आता आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहे……. इथे मी माझ्या घरी उपलब्ध सामानामध्ये डिंकाचे लाडू केले आहे.
डिंकाचे लाडू मध्ये तुम्ही १०० ग्रॅम गोळंबी तसेच १०० ग्रॅम पिस्ते, १०० ग्रॅम चारोळी, १०० ग्रॅम खरबुजाच्या बिया ,१०० ग्रॅम पम्पकिन सीड ,१०० ग्रॅम अक्रोड घालू शकतात……
आपण जे वापरले आहे ते बेसिक साहित्य आहे… चला तर मग एन्जॉय करूया काजू बदाम स्पेशल डिंकाचे लाडू……
टिप्स::
डिंकाच्या लाडूची तुम्हाला मात्रा वाढवायची असल्यास तुम्ही त्यामध्ये खारीक पावडर आणि खोबऱ्याचे प्रमाण वाढवू शकतात ते साधारण एक किलो एवढे घेऊ शकतात एक किलो साठी ही ड्रायफूट चे प्रमाण तेच राहू देऊ शकतात… किंवा वाढवले तरी चालेल….
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ :३०मिनिटे
एकूण वेळ :१ तास३०मिनिटे
परिमाण ::साधारण ६० लाडू होतात
