कळण्याची भाकरी आणि लाल मिरचीची शेंगदाण्याची चटणी

by Vaishali Chaudhari

कळण्याची भाकरी आणि लाल मिरचीची शेंगदाण्याची चटणी


प्रस्तावना::

आजचा मेनू ऐकल्यावर असं वाटतंय की मी आज माझ्या आजीच्या गावाला आलेले आहे… मेनू ऐकल्यावरच तोंडाला कसे पाणी सुटले कळण्याची भाकरी आणि शेंगदाण्याची लाल मिरचीची चटणी आणि सोबत कांदा वाह!!


साहित्य::

  • अर्धी वाटी शेंगदाणे
  • पाच ते सहा लाल मिरच्या
  • सात ते आठ लसूण पाकळ्या,
  • कोथिंबीर
  • जिरे मोहरी
  • फोडणीसाठी तेल
  • मीठ
  • पाणी


कृती::

प्रथम तवा गरम झाल्यानंतर त्यावर शेंगदाणे घाला आणि शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या. त्यामधला कचवटपणा निघून जाईल.

आता आपल्या लाल मिरच्या भाजून घ्या.. लाल मिरच्या या बाजूनेच वापरावे. नाहीतर चटणी उगीर लागते.

शेंगदाणे का डिश मध्ये काढून घ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरलेले शेंगदाणे त्यानंतर लाल मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या चवीप्रमाणे मीठ आणि थोडे पाणी घालून चटणी फिरवून घ्या.

चटणी ही थोडी दरदरीत वाटावी. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालून एक ते दोन फेर घ्यावे. चटणी एकदम बारीक करू नये .

तिच्यातला दरदरीतपणा टिकून राहावा. पूर्वी हीच चटणी आपण पाट्या वरवंट्यावर वाटायचं त्यामुळे गावाकडचा आस्वाद म्हणजे वा!!!

खूपच छान पण आज ही चटणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सहज वाटू शकतो… पण आपल्याला पाट्यावरच्या वाटलेल्या याचा आस्वाद येत नाही.

आपल्याकडे पाटावर म्हणता असल्यास त्यावर ही चटणी नक्की वाटावी. या चटणी मध्ये आपल्याला हवे तेवढे आपण पाण्याचा वापर करू शकतो .

आपल्याला चटणी किती पातळ हवी याप्रमाणे पाण्याचा वापर करावा. एका कढईमध्ये तेल गरम करा. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी तडतडावा.

त्यानंतर तुम्ही त्यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याचे पाने घालू शकतात… आणि त्यानंतर त्यामध्ये चटणी घालावी लगेचच गॅस बंद करावा…

आता कळण्याची भाकरी तयार करून घ्यावी ही चटणी आपण करण्याच्या भाकरी सोबत किंवा चपाती सोबत किंवा एखाद्या दशमी सोबत सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा कुठलेही पराठे असले तरी ही चटणी त्यासोबत एकदम उत्तम लागते…..

झणझणीत असते ही चटणी… त्यासोबत छान पैकी लिंबाचे लोणचे आणि फोडलेला कांदा हा मेनू कोणत्याही ऋतूत तुम्ही खाऊ शकतात..

उन्हाळा पावसाळा हिवाळा एकदम छान असा लागणारा मेनू आहे… यासोबत तुम्ही ताकाची कढी सुद्धा खाऊ शकतात…

चला तर मग आपली कळण्याची भाकरी आणि लाल मिरचीची शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे….


टिप्स::

इथे चटणी करताना मी शेंगदाण्याची साल काढलेले नाही कारण आपल्याला लाल चटणी करायची आहे त्यामुळे साल काढण्याची गरज नाही पण तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही साल काढू शकतात… मिरच्या ह्या मध्यम भाजाव्या नाहीतर चटणी मध्ये कडसरपणा निर्माण होईल…


वेळ व परिमाण:


तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ: ३० मिनिटे
परिमाण: दोन व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

5326

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.