गव्हाच्या पिठाच्या नानकटाई

by Vaishali Chaudhari

गव्हाच्या पिठाच्या नानकटाई


प्रस्तावना::

आपण नेहमी मैद्याच्या नान कटाई बघत असतो. मैदाच्या नानकटाई या नरम येतात.. आणि गव्हाच्या पिठाच्या नानकटाई थोड्या कडक येतात परंतु त्या अधिक पौष्टिक असतात…


साहित्य:::

  • एक वाटी सपाट गव्हाचे पीठ (कणिक)
  • अर्धी फुल वाटी तूप
  • अर्धी वाटी पिठीसाखर
  • पाव कप बेसन
  • इथे सर्व साहित्य मेजरींग कपने मेजर केलेले आहे..


कृती::

एका मोठ्या काचेच्या बाऊलमध्ये न पातळ केलेले ना जास्त घट्ट असे साजूक तूप(इथे तुम्ही वनस्पती घेता सुद्धा वापर करू शकतात वनस्पती तुपामुळे नानकटाइ एकदम मऊ येतील..) घाला. हे तू विस्करच्या साह्याने चांगले मऊ होईपर्यंत फेटा …


तुपाचा रंग पांढराशुभ्र होईल.. आणि ते फेसकटल्यासारखे होईल. त्यामध्ये पिठीसाखर घाला.

आणि विस्करच्या साह्याने पाच ते दहा मिनिटे चांगले मऊ लोण्याप्रमाणे होईपर्यंत फेटत रहा. मऊ स्पंज असा गोळा तयार होईल.

तूप आणि साखर स्पंजी झाल्यानंतर त्यामध्ये कणिक (बसेल इतकी)बेसन घाला आणि त्याचा एक गोळा मळून घ्या..

(त्याचा गोळा तयार करण्यासाठी थोडे दोन चमचे दूध घाला. )एक वाटी कणीक प्रमाण सपाट वाटी घ्यायची आहे फुल भरून घ्यायची नाही.

कारण कणिक जास्त झाल्यास गोळा मळता येणार नाही. किंवा त्यामध्ये बसेल एवढीच कणीक तुम्ही त्यामध्ये मळा..

कारण आपला सॉफ्ट असा गोळा तयार झाला पाहिजे..आता याचा गोळा तयार झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे हातावर गोळे करून घ्या.

त्यानंतर छोटे छोटे गोळ्या केल्यानंतर त्याला चिपट असा आकार द्या.. याप्रमाणे सर्व गोळ्याचे लहान असे गोळे करून घ्या.

त्यावर बदाम आणि काजूचे काप लावा. आता ओवन 180° वर प्री-हीट करून घ्या.. ओवन प्री हिट केल्यानंतर साधारण तीन ते चार मिनिटे नानकटाई डिशवर ठेवून बेक करून घ्या.

तसेच आपल्याकडे ओव्हन नसल्यास आपण कुकरमध्ये सुद्धा या नानकटाई बेक करू शकतो ..कुकरमध्ये मीठ घाला…

साधारण एक वाटी मीठ खाली तळाशी घाला आणि ते पसरवून घ्या.. आणि गॅस चालू करा त्यामध्ये स्टॅन्ड ठेवा ..

एका डिशवर साधारण पाच ते सहा नानकटाई ठेवा आणि स्टँडवर ही डिश ठेवा साधारण चार ते पाच मिनिटे झाकण ठेवून नानकटाई बेक होऊ द्या..

गॅसची आच एकदम मंद ठेवा.. पाच मिनिटे झाल्यानंतर नानकटाई चांगल्या फुलून आलेल्या असतील.. आता आपल्याला बेक झालेल्या असतील…

ओव्हनमधील नानकटाई सुद्धा लगेचच होतात जास्त वेळ आपण होऊ दिल्यास त्याला जास्त तांबूस रंग येतो..

किंवा त्या जळकटही होऊ शकतात.. गव्हाच्या पिठाची नानकटाई ही थोडी कडक असते.. (पण इथे आपण वनस्पती तूप जर वापर केल्यास त्याच नान कटाई मऊ येतात)..

पण आरोग्यासाठी साजूक तूप उत्तम असते.. आणि चवीला अतिउत्तम लागतात….. मैदाच्या नानकटाई या एकदमच मऊ लागतात …

पुढच्या रेसिपी मध्ये मी मैद्याच्या नानकटाई सुद्धा दाखवणार आहे… चला तर मग आता आपण पौष्टिक कणकेच्या नानकटाई एन्जॉय करूया…


टिप्स::

इथे आपण तूप विस्करच्या साह्याने फेटल्यानंतर आपल्या तुपामध्ये जेवढे बेसन पूर्ण घाला परंतु कणिक जेवढी बसेल तेवढेच पीठ त्यामध्ये मळा ..जेणेकरून मिश्रणाचा गोळा तयार होईल.. ही टीप नक्की लक्षात ठेवा… तुम्हाला दुधाची गरजच पडणार नाही…

वेळ व परिमाण::


तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ :४०मिनिटे
परिमाण ::चार व्यक्तींसाठी २० नानकटाई

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

5709

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.