उपमा
प्रस्तावना:
उपमा हा नाश्ता साठी खाल्ला जाणारा पदार्थ आहे. उपमा हा पचायलाही हलका असतो.
साहित्य:

१ वाटी रवा,
१ कांदा,
१ टोमॅटो,
१ लसूण,
अर्धा इंच अद्रक तुकडा,
८ बारीक हिरव्या मिरच्या,
जिरे, फोडणीसाठी तेल,
१ चमचा साजूक तूप,
२चिमटी हिंग,
मीठ,
कोथिंबीर ,
गरम पाणी
कृती:
कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या त्यात जिरे घालून फोडणी घाला. त्यामध्ये मिरचीचे काप करून घाला. त्यामध्ये चिरलेला कांदा आणि टोमॅटो घाला. चांगले गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यामध्ये हिंग घाला.
त्यामध्ये रवा घाला. रवा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतवा.
गुलाबी रंग आल्यानंतर रव्यामध्ये गरम केलेले पाणी घाला.

रव्याला चांगली वाफ येईपर्यंत झाकण ठेवून वाफवून घ्या.
उपम्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला. साजूक तूप घाला.
चिरलेली कोथिंबीर वरून घाला.
उपमा चांगला वाफला की गॅस बंद करा. उपमा तयार आहे.
टिप्स:

उपमा चांगला गुलाबी रंगावर परतवला गेला पाहिजे नाहीतर त्याची चव कचवट लागेल.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: १०मिनिटे
एकूण वेळ: ३० मिनिटे
परिमाण: ४ जणांसाठी
