हळद मिरची चटपटीत असे लोणचे!!Halad Mirch Pickle
प्रस्तावना/Introduction:::
हळद आणि मिरचीचे लोणचे हे आरोग्यदायी असे लोणचे आहे हळद ही आरोग्यासाठी एकदम उत्तम अशी असते…. हळदीचे लोणचे रोज थोडे तरी खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते….. आणि खाण्यासही एकदम चटपटीत लागते…. थंडीच्या दिवसांमध्ये ओली हळद ही मिळते त्यावेळेस आपण हे लोणचे थोडे थोडे करून ताजे ताजे करून खावे…..

साहित्य/Ingredients:::
- 100 ग्रॅम ओली हळद
- चार ते पाच जाड हिरव्या मिरच्या
- सात ते आठ लिंबू
- पाव चमचा हिंग पावडर
- दोन फुल चमचे मीठ
- अर्धी वाटी तेल
- 100 ग्रॅम मोहरी डाळ
कृती/Procedure:::
हळद छान अशी स्वच्छ धुऊन घ्यावी त्यानंतर हळद किसून घ्यावी…..

त्यानंतर मिरचीचे बारीक असे काप करून घ्यावे…
सात ते आठ लिंबांचा रस काढून घ्यावा ही लिंब आकाराने मोठी घ्यावीत म्हणजे भरपूर रस पडेल आणि पिवळी असली तर एकदमच उत्तम म्हणजे जास्तही रस पडेल…..
रस एका वाटीमध्ये काढून घ्यावा….

हळद किसल्यानंतर त्यामध्ये अर्धा इंच अद्रकाचा तुकडा सुद्धा किसून घ्यावा…
एका मोठ्या पातेल्यामध्ये किसलेली हळद किसलेला अद्रक मिरचीचे तुकडे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यावे…. त्यामध्ये लिंबाचा आपण काढलेला रस घालावा….

यामध्ये दोन चमचे मीठ घालावे….
त्यानंतर एका कढईमध्ये अर्धी वाटी तेल घालून छान कडकडीत तेल गरम करावे….
तेल गरम केल्यानंतर तेल थंड करावे….

इथे मी अर्धी वाटी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही एक वाटी तेलाचा वापर सुद्धा करू शकतात काही काहींना लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त आवडते त्यामुळे तुम्ही एक वाटी तेलाचा सुद्धा वापर इथे करू शकतात…
अगदी थोडेच थंड करावे त्यामध्ये पाव चमचा हळद आणि मोहरीची डाळ घालावी मोहरीची डाळ चांगली तळली गेल्यानंतर ते मिश्रण थंड होऊ द्यावे……

मिश्रण थंड झाल्यानंतर आपण ते हळदीच्या मिश्रणामध्ये घालावे…
आता हे मिश्रण थंड झाले की काचेच्या बरणीमध्ये भरावे……

त्यानंतर मिश्रण छान मुरू द्यावे.. मिश्रण चांगले मोडल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर आपल्या लोणच्याची चव एकदम अप्रतिम लागते अगदी चटपटीत असे आपले हळदी मिरची लोणचे तयार झाले आहे…
टिप्स/Tips:::

इथे आपण १०० ग्रामचे लोणचे तयार केलेले आहे कारण हे लोणचे ताजे ताजे तयार करून पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुम्ही खाऊन घेऊ शकतात आणि नवीन लोणचे तयार करू शकतात म्हणजे जेणेकरून लोणच्याला बुरशी येणार नाही कारण आपण इथे लोणचे कमी तेलामध्ये तयार केलेले आहे जर तुम्हाला हे लोणचे खूप दिवस टिकवायचे असल्यास तुम्ही तेलाचा वापर भरपूर करावा म्हणजे वळणीमध्ये साधारण एक पेड तेल लोणच्याच्या वर हवे… म्हणजे लोणचे चांगले टिकेल….
वेळ आणि परिमाण Time and Quantity
तयारीची वेळ::
२०मिनिटे
एकूण वेळ::: ४०मिनिटे
परिमाण:::२०० ग्राम लोणचे
टॅग्स Tags

#हळदमिरचीचेलोणचे #हळदमिरची #चटपटीतलोणचे #झणझणीतलोणचे #घरगुतीलोणचे #लोणच्याचीरेसिपी #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #स्वादिष्टरेसिपी #SwaadGharcha #TurmericChilliPickle #HaldiMirchiPickle #GreenChilliPickle #IndianPickle #HomemadePickle #MaharashtrianFood #PickleRecipe #SpicyPickle
DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Snacks Indian Sweets Indian Traditional Sweets Indian Vegetarian Recipes JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe MaharashtrianRecipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Swaad GharCha sweet Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी



