कच्च्या कैरीचे लोणचे

प्रस्तावना:::
चला चला पावसाळा आला!!!
पावसाळा आला की कैऱ्या आल्या म्हटल्या की आपल्याला लोणचे घालायचे असते… बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या मिळतात…
गावरानी कैरीचे लोणचे तसेच घाटावरची कैरी त्याचे लोणचे… कोणते आंबट तर कोणते गोड…. तुम्हाला कोणती लोणचे आवडत??? आज आपण गोड लोणचे बघणार आहे….
साहित्य ::::

- तीन किलो कैऱ्या
- दीड किलो गूळ
- एक पॅकेट केप्रो लोणचे मसाला
- 50 ग्रॅम तिखट
- पन्नास ग्राम हळद
- 100 ग्रॅम मोहरीची डाळ
- 100 ग्रॅम धनपूर जाडसर कूट
- 100 ग्रॅम शो जळकोट
- ५ ग्रॅम हिंग कुटलेला
- एक चमचा मेथी कुटलेली
- आणि घरगुती गरम (खडा )मसाला
- 200 ग्रॅम मीठ
- एक किलो तेल(शेंगदाणा तेल)
खडा मसाला तयार करण्याचे साहित्य व कृती:::
15 लवंग 15 मिरे 15 कापूर चिनी एक इंच सुंठ्याचा तुकडा तीन मसाला इलायची सोलून त्यातील दाणे काढून घ्यायचे….
आणि एक दालचिनी स्टिक या सर्व मसाल्यांना खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्या आपला खडा मसाला तयार झालेला आहे…
लोणच्याची कृती:::
सर्वप्रथम मोठ्या पातेल्यामध्ये एक किलो तेल कडकडीत गरम करून घ्यावे….लोणच्यासाठी फक्त शेंगदाणा तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे ते तुम्ही कुठल्याही ब्रांड वापरू शकतात…

तेल कडकडीत गरम केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा लवंग तडतडून घ्यायचे आहे…. सर्व मसाले एखाद्या तगारीमध्ये किंवा मोठ्या परातामध्ये ज्याप्रमाणे मी दाखवले आहे …

त्याप्रमाणे आपल्याला प्रमाणानुसार वेगवेगळे टाकून घ्यायचे आहे….तेल गरम असतानाच आपल्याला कडची च्या साह्याने तेल मोहरीच्या डाळीवर तसेच गरम मसाल्यावर हिंगावर मेथीच्या दाण्यांवर हळूहळू सर्व मसाल्यांवर तेल आपल्याला घालायचे आहे…

परंतु सर्वप्रथम आपल्याला मोहरीच्या डाळ वरच घालायचे आहे आणि मेथीच्या दाण्यांवर कारण आपल्याला हे जवळपास तळले गेले पाहिजे…
त्यानंतर सर्व मसाला एकत्र करून घ्यावा… हा मसाला साधारण तीन तास थंड होऊ द्यावा… मसाला थंड झाल्यानंतर त्यामध्ये गुळ कालवून घ्यावा….

गुळ सर्वत्र कालवल्यानंतर एक ते दोन तासाने त्यामध्ये फोडलेल्या कैऱ्या एकत्र कराव्या… कारण तोपर्यंत मसाला पूर्णपणे थंड झालेला असेल….
कारण गरम मसाल्यात आपण कैऱ्या घातल्या तर त्या नरम पडू शकतात… त्यामुळे गरम मसाल्यात कधीही कैऱ्या घालू नये मसाला पूर्णपणे थंड झाल्यावरच त्यामध्ये कैऱ्या घालाव्या….

आता आपले लोणचे साधारण दोन ते तीन दिवसांमध्ये मुरूम तयार होईल… हे लोणचे तुम्ही सतत चमच्याच्या साह्याने ढवळायचे आहे…
लोणचे चिनीच्या बळणीमध्ये भरण्याची पद्धत:::
सर्वप्रथम थोडे वाटीमध्ये तेल गरम करून घ्यावे.. त्यामध्ये पाव चमचा हिंग घालावा आणि ही गरम गरम वाटी लोणच्याच्या बरणीमध्ये ठेवावी आणि वरून दोन मिनिटे झाकण ठेवून द्यावे…

त्यानंतर त्यामध्ये तुम्ही लोणचे भरू शकतात.. याला लोणच्याला हिंगाची धुनी देणे म्हणतात…… त्यामुळे वर्षभर लोणच्याला अगदी सुंदर सुवास आणि चांगले टिकते….
दोन-दोन दिवसांनी चमच्याच्या साह्याने लोणचे ढवळून घ्यावे… त्यामुळे सर्व लोणचे व्यवस्थित एकत्र होईल…. आणि सर्व जिन्नस एकजीव होतील…
आता आपले दोनशे छान असे तयार झालेले आहे त्यावर एखादी डिश ठेवून झाकून ठेवावे…
टिप्स :::

लोणचे तयार करताना शक्यतो घाटावरच्या कैरीचाच वापर करावा किंवा गावराणी कैरीचा वापर करावा… ही कैरी वर्षभर चांगली टिकते आपले लोणचे कधीही खराब होत नाही….
