शेंगदाणे कुटी वांग्याची भाजी. !!! Brinjal with spices
अस्सल गावरान पद्धतीची दाण्याच्या कुटाची वांग्याची भाजी
दाण्याचा कूट घालून बनवा चमचमीत वांग्याची भाजी
महाराष्ट्रीयन पद्धतीची चविष्ट वांग्याची भाजी
प्रस्तावना Introduction:::
दाणेकुटी वांग म्हटलं की आपल्याला झणझणीत अशी वांग्याची भाजी ची आठवण होते!!!! गावाला गेलं की ही भाजी आवर्जून आजीला करायला लावायचं आणि ती गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत खायचं!!!! थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी तर चवीला एकदम अप्रतिम!!!

साहित्य Ingredients::::

- एक मोठे भारताचे वांगे
- आठ ते दहा बारीक हिरव्या मिरच्या
- दहा ते बारा लसूण पाकळ्या
- अर्धा इंच अदरकाचा तुकडा
- कोथिंबीर
- पाव वाटी शेंगदाणे
- पाव चमचा हळद
- अर्धा चमचा धना पूड
- पाव चमचा गरम मसाला
- फोडणीसाठी जिरे मोहरी
- फोडणीसाठी तेल
- चवीप्रमाणे मीठ
कृती Procedures :::
सर्वप्रथम मोठे वांगे दोन कापून घ्या ते गरम पाण्यातून धुवून घ्या…

त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट तयार करून घ्या….
अद्रक लसणाची पेस्ट तयार झाल्यानंतर मिरचीचे काप करून घ्या….
तव्यावर चांगले शेंगदाणे खरपूस भाजून घ्या त्याची साल काढून घ्या आणि एकदम जाडसर असा शेंगदाण्याचे कूट याचा भरडा तयार करून घ्या….. आता एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घाला….

त्यानंतर त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला….

त्यानंतर त्यामध्ये आपले वांग्याच्या फोडी घाला त्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा धनापूर पाव चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित परतवून घ्या….

त्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास इतके. गरम पाणी घाला…..

झाकण ठेवून चांगली पाच ते दहा मिनिटे भाजी शिजू द्या त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला…

पुन्हा दोन ते तीन मिनिटे भाजी चांगली परतवून घ्या आणि त्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा जाडसर भरडा केलेला आहे तो घाला….आणि त्यावर चिरलेली कोथिंबीर घाला… आपली दाणी कुठून वांग्याची भाजी आता तयार झालेली आहे…

ही भाजी तुम्ही भाकरी सोबत किंवा पोळी सोबत खाऊ शकतात ही भाजी थंडीमध्ये अगदी अप्रतिम लागते…

आणि झटपटही बनते… तर आपण आज बघितली दाणे कुठून वांग्याची भाजी!!!!
टिप्स/ Tips::

भजी तयार करत असताना तुम्ही कुकरचे झाकण लावले तरी चालते परंतु त्यावर झाकण ठेवूनच भाजी वाफवावे म्हणजे भाजीची चव एकदम अप्रतिम लागते….
वेळ आणि परिमाण Time and Quantity:::
तयारीची वेळ::१० मिनिटे
एकूण वेळ::४० मिनिटे
परिमाण २व्यक्तींसाठी
टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords::

#VangyachiBhaji #VangyachiBhajiRecipe #PeanutBrinjalCurry #MaharashtrianRecipe #MarathiRecipe #GavranBhaji #BrinjalRecipe #PeanutMasala #TraditionalFood #IndianFood
Anarsa Preparation DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe Festive Recipes GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Snacks Indian Sweets JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Swaad GharCha sweet Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti Vrat Special Recipe {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी
-
शेंगदाणे कुटी वांग्याची भाजी. !!! Brinjal with spices

📅 27 Nov 2026👁 3 वेळा पाहिले 💬 WhatsApp वर शेअर करा 🔗 लिंक कॉपी ♡ सेव्ह शेंगदाणे कुटी वांग्याची भाजी. !!! Brinjal with spices अस्सल गावरान पद्धतीची दाण्याच्या कुटाची वांग्याची भाजी दाण्याचा कूट घालून बनवा चमचमीत वांग्याची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीची चविष्ट वांग्याची भाजी प्रस्तावना Introduction::: दाणेकुटी वांग म्हटलं की आपल्याला झणझणीत अशी वांग्याची भाजी…







