हॉटेलसारखी मेथी मटार मलाई–एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल
चटपटीत अशी मेथी मटर मलई !!! Methi Mutter Malai
प्रस्तावना Introduction:::
मेथी मलाई मटार ही भाजी मेथीची भाजी न खाणाऱ्यांना सुद्धा आवडीने खाऊ लागतील अशी भाजी आहे…. मेथीची भाजी ही अत्यंत पोष्टिक असते पण मेथी कडू लागत असल्यामुळे भाजी खाण्यास कोणीही तयार होत नाही…
त्यामुळे ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्यास घरातील सर्व लोक आवडीने खातील
साहित्य/Ingredients ::::
- १ वाटी तोडून ठेवलेली मेथी,
- २ वाट्या वाफवलेला मटार,
- १ मोठा कांदा,
- १ टोमॅटो
- १ टे. स्पून भिजवून वाटलेली खसखस,
- १० काजू,
- १ कप दूध,
- १ टे. स्पून अर्धा कप दुधात भिजविलेले कॉर्नफ्लोअर,
- पाऊण टी स्पून साखर,
- चवीला मीठ,
- १ इंचअद्रकाचा तुकडा,
- २ हिरव्या मिरच्यांची ,
- २ टे. स्पून ताजे क्रीम,
- १ टी स्पून लाल तिखट,
- १ टे. स्पून तूप व
- १ टे. स्पून तेल,
- कोथिंबीर,
- ८ लसूण पाकळ्या,
कृती/ Procedures:
सर्वप्रथम मेथी बारीक चिरून घ्या …..
त्यानंतर कांदाही चिरून घ्या ….
टोमॅटो बारीक चिरून घ्या.कोथिंबीर चिरून घ्या…..
त्यानंतर भिजवलेले काजूची आणि भिजवलेल्या खसखस चीपेस्ट तयार करून घ्या…..
लसूण अद्रक आणि मिरचीची पेस्ट तयार करून घ्या…..
पातेल्यात तेल तापवून कांदा परतून लाल करावा. टोमॅटो घालावा व तेल सुटेपर्यंत परतून कांदा टोमॅटोच्या मिश्रणाची मिक्सरमध्ये पेस्ट करावी. थोडे पाणी घालून ती बारीक पेस्ट चांगली करावी
पुन्हा थोडे कढईत तेल घालून तेलात आले, लसूण घालून परतावे व त्यातच कांदा, टोमॅटो पेस्ट व हिरवी मिरची घालून तेल सुटेपर्यंत परतणे……
सर्व मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये काजू, खसखसची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या…..
चिरलेली मेथी थोड्या तेल मेथी चांगली घालून तळून घ्या….
तसेच मटर पाण्यामध्ये घालून उकडून घ्या…..
तळलेली मेथी व उकडलेले मटार घालून परतावे व नंतर लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ व साखर घालावी व चांगले परतावे……
त्यानंतर या मिश्रणामध्ये कॉर्नफ्लोअर मिश्रण घालावे. दूध घालून दाट ग्रेव्ही होईपर्यंत शिजवावे …. नंतर गॅस बंद करावा आणि भाजी भाजी तयार झालेली आहे…मेथी मटर मलाई आपली तयार झालेली आहे इथे आपण फ्रेश क्रीम चा वापर केलेला आहे त्यामुळे भाजीची चव एकदम अप्रतिम लागते ही तुम्ही चपाती किंवा नान सोबत किंवा फुलक्या सोबत सुद्धा खाऊ शकतात…..
टिप्स Tips::::
भाजी तयार करत असताना ज्यावेळेस आपण दूध घालतो त्यावेळेस सतत ढवळत रहा…. कारण दूध घातल्यानंतर भाजी ची ग्रेव्ही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे सतत ढवळत राहिल्यामुळेच ग्रेव्ही चांगली तयार होईल…..
वेळ आणि परिमाण Time and Quantity:::
तयारीची वेळ::२० मिनिटे
एकूण वेळ::४० मिनिटे
परिमाण::५ व्यक्ती साठी
टॅग्स आणि कीवर्ड Tags and Keywords
Anarase Pith Anarsa Flour Anarsa Pith Anarsa Preparation Anarsa Recipe DalBatiRecipe DesiKhandeshi DesiKhandeshiZaiqa Diwali Faral Diwali Sweets easy homemade recipe GavrooranFood Homemade Flour homemade recipe Homemade Sweets Indian Sweets Indian Traditional Sweets JalgaonFood KalnyachiBhakri khandesh-special KhandeshiFlavors KhandeshiFood KhandeshiRecipes KhandeshiShevBhaji KhandeshiVangyacheBharit KhandeshiVaranBatti KhandeshiZanazanit KhandeshiZatpat KhandeshSpecial Maharashtrian food Maharashtrian Recipe Maharashtrian Recipes MaharashtrianRecipes MaharashtrianThali Marathi recipe Marathi Recipes MarathiSwayampak ShevBhaji Traditional Diwali Recipes Traditional Indian Sweets TraditionalMarathiFood VaranBatti {mar} recipe घरगुती रेसिपी मराठी रेसिपी
#MethiMatarMalai #MethiMatar #MethiRecipe #MatarRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #RestaurantStyleRecipe #CreamyCurry #IndianFood #VegRecipe







