बॉईल अंड्याची भुर्जी

प्रस्तावना::
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी खाल्ले पाहिजे. बॉईल अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन असते. जे की लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी अत्यंत आवश्यक असते.
साहित्य:


- ५ बॉई ल अंडी
- दोन टमाटे
- दोन कांदे
- तीन हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर
- 6-7 लसणाच्या पाकळ्या
- अर्धा इंच अद्रकाचा तुकडा,
- हळद पाव चमचा
- तिखट एक चमचा
- गरम मसाला पाव चमचा
- चवीप्रमाणे मीठ
- तेल
- आणि ब्रेड
कृती::
सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये गार पाण्यामध्ये पाच अंडी घालून गॅसवर उकळण्यास ठेवावे. गार पाण्यामध्ये घातल्यामुळे अंडी फुटत नाही.
डायरेक्ट गरम पाणी करून केले तर अंडी फुटतात. साधारण दहा मिनिटे ते पंधरा मिनिटे अंडी उघडण्यास वेळ लागतो.
अंडी उकडल्यानंतर ती गार पाण्यामध्ये घाला. घर पाण्यात ना बाहेर काढा आणि त्याची सालट काढून घ्या. अंडीचे सालट व्यवस्थित काढा नाहीतर भुर्जी कचकच लागेल.
आता हे सोललेले अंडे त्याचा किसणीवर किस करून घ्या. एका साईडला बारीक कांदा चिरून घ्या. टोमॅटो ही बारीक चिरून घ्या.

मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसणाची आणि मिरचीची थोडे पाणी घालून पेस्ट करून घ्या. एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करा.
त्यामध्ये कांदा तांबूस रंगावर परतून घ्या. आता त्यामध्ये टोमॅटोही परतून घ्या. कांदा टोमॅटो परतल्यानंतर अद्रक लसूण मिरचीची पेस्ट त्यामध्ये घाला आणि तेही परतवून घ्या.

हे मिश्रण परतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला घाला आणि परतवून घ्या.
त्यामध्ये किसलेल्या अंड्याचा चुरा घाला. चांगले जिन्नस एकजीव करा. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्या. थोडा त्यावर पाण्याचा शिपका मारा.

वरून अजून थोडे तेल सोडा. वरून चिरलेली कोथिंबीर घाला. आता आपली अंड्याची गरमागरम भुरजी तयार झालेली आहे……….
आता गॅसवर तवा गरम करायला ठेवून त्यावर तेल लावून थोडे मीठ तिखट घालून त्यावर पाव भाजून घ्या.
आणि पाव सोबत भुर्जी सर्व करा…. आपली बॉई ल अंड्याची भुर्जी तयार आहे….. येथे तुम्ही लादी पावचाही उपयोग करू शकतात येथे मी स्लाईस पावचा उपयोग केलेला आहे.
किंवा ही केलेली भुर्जी स्लाईस पाव दोघ साईडने भाजून घेणे आणि त्यामध्ये ही भुर्जी भरून दोन्ही साईड ने पाव ठेवून खरबूज भाजून घेणे. हे सँडविच टाईप लागेल.
येथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही पाव भाजण्यासाठी बटरचाही वापर करू शकतात.
टिप्स::

टिप्स::
इथे तुम्ही गावराणी अंडे यात तुम्ही कोणतेही वापरू शकतात. गुरुजी तुम्ही चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात किंवा पोळी सोबत सुद्धा खाऊ शकतात.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:१० मिनिटे
एकूण वेळ: ४० मिनिटे
परिमाण:२ जणांसाठी
