शेंगदाण्याची चटणी आणि कळण्याची भाकरी
प्रस्तावना::
अरे वा!!! आज काय चटणी आणि कळण्याच्या भाकरीचा बेत वाटतं…..
असं म्हणणारे आपल्याला खूप भेटतील. पण बरेच जणांना कशी बनवायची हे माहितही नसेल. पण त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय चला तर मग बघूया शेंगदाण्याची चटणी आणि कळण्याची भाकरी…..
सर्वप्रथम पाण्यात आहोत शेंगदाण्याची चटणी..
साहित्य::
- १ वाटी शेंगदाणे
- ५ जाड हिरव्या मिरच्या
- ८ लसूण पाकळ्या
- अर्धी वाटी कोथिंबीर
- फोडणीसाठी तेल
- जिरे मोहरी
- मीठ चवीप्रमाणे
कृती::
गॅसवर तवा गरम करून घेणे. तव्यावर शेंगदाणे घालून मंद आचेवर खरपूस असे भाजून घेणे. आता जाड हिरव्या मिरच्यांची नाके काढून हिरव्या मिरच्या धुवून त्या तव्यावर घालाव्या.
मिरच्या चांगल्या दोघती ग बाजूने खरपूस भाजून घ्याव्यात त्यावर थोडे चार-पाच थेंब तेलाची घालावे त्यामुळे मिरच्या चांगल्या भाजल्या जातात आतून कच्च्या राहत नाही.
कारण मिरच्या कच्च्या राहिल्यास शेंगदाण्याचे चटणीची चव कचवट लागते. चला तर मग आता शेंगदाणे भाजल्यानंतर त्याची सालट काढून घेऊया.
हे शेंगदाण्याची साल काढल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे भाजलेल्या जाडी हिरव्या मिरच्या आठ लसूण पाकळ्या तसेच चवीप्रमाणे मीठ घालावे.
आता मिक्सरवर हळूहळू फिरवत घ्यावे. त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालावे पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यावे.
त्यामध्ये कोथिंबीर घालून पुन्हा फिरवावे. हे मिश्रण फिरवताना सिम सिम वर फिरवावे जेणेकरून चटणी अत्यंत बारीक होणार नाही ती दाणेदार होईल.
आपल्याकडे पाटावर बंटा असल्यास आपण ही चटणी पाट्यावर सुद्धा वाटू शकतात.. आहाहा पाट्यावर वाटलेल्या चटणीची तर चवच काही अलग असते ..
आमची आजी त्यावेळेला पाटावर वरवंटावरची चटणी आणि गरम गरम करण्याची भाकरी हा बेत तर आम्हाला खूपच आवडायचा…
ही चटणी पातेल्यामध्ये काढून घ्यावी.चटणी मध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण पाणी घालू शकतो.
पण आपण भाकर वर सेंटरला चटणी घेऊन आपण खातो त्यामुळे चटणी घट्टसरच असावी. एका कढईमध्ये थोडे तेल घालून त्याला जिरे मोहरीची फोडणी घालावी.
त्यामध्ये चटणी घालावी गॅस लगेच बंद करावा चटणी गरम होऊ देऊ नये. चला तर मग आपली शेंगदाण्याची चटणी आता तयार आहे…..
आता आपण बघणार आहोत कळण्याची भाकरी
साहित्य:
१ मोठी वाटी कळण्याचे पीठ
गरम पाणी
मीठ
कृती::
एक वाटी पीठ परातीमध्ये घालून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे आता मीठ चांगले पिठामध्ये मिक्स करून घ्यावे.
त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालून त्याचा चांगला उंडा होईपर्यंत मळून करावा. भाकरीचा उंडा चांगला मळून घ्यावा.
भाकरीचा उंडा जितका चांगला मळला जाईल तितकी चांगली भाकरी मऊसूद येईल. इथे आपण गरम पाण्याचा वापर त्यासाठीच केलेला आहे की आपली भाकरी न तुकडे होता तयार व्हावी.
आता भाकरीच्या उंड्याखाली थोडे पीठ घालावे आणि भाकरी परातातच थापून घ्यावी. जल भाकरी थापता येत नसेल त्यांनी पोळीपाटावर पीठ घालून भाकरीचा उंडा ठेवून लाटण्याने लाटून घेतले तरी चालेल.
तवा गरम करून घेणे आणि तापलेल्या तव्यावर लाटलेली भाकरी घालून त्या भाकरीवर पाणी लावावे. पाणी लावल्यानंतर लगेचच सराट्याच्या साह्याने भाकरी उलटवून घ्यावी.
भाकरी दोन्ही बाजूने चांगली खरपूस भाजून घ्यावी.. आपली भाकरी आता तयार झालेली आहे….
चला तर मग आता चटणी आणि भाकरी त्यासोबत कांद्याच्या फोडी, लोणचेमस्त बेत आहे ना चला आता लवकरात लवकर आपण जेवायला बसुयात…..
टिप्स::
भाकरीचे पीठ भिजवताना चांगली मळून घेतलेले हवे त्यामुळे भाकरी लाटताना त्याला चिरा जात नाही. आणि भाकरी गोल अशी होते…
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ: ३० मिनिटे
परिमाण: २ जणांसाठी.
