चिवय च्या भाजीचे फुणके (भेणके)

by Vaishali Chaudhari

चिवय च्या भाजीचे फुणके (भेणके)


प्रस्तावना::

चिवयच्या भाजीची फुनके हे पूर्वीपासून केले जाणारे आणि ओल्या डाळी पासून तयार होणारे अत्यंत चवदार असे असते. चिवय भाजी ही उन्हाळ्यामध्ये शेतामध्ये असते.


साहित्य::

  • पाव किलो चिवय ची भाजी
  • दोन मुगाची डाळ
  • एक वाटी हरभऱ्याची डाळ
  • एक कांदा
  • पाच ते सहा हिरव्या मिरच्या
  • पाच ते सहा लसुन
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा,
  • अर्धी वाटी धने,
  • अर्धी वाटी जिरे
  • अर्धी वाटी शोप,
  • हळद
  • मीठ
  • कोथिंबीर
  • तेल
  • पाणी


कृती::

रात्री दोन वाटी मुगाची डाळ एक वाटी हरभऱ्याची डाळ भिजत घालून ठेवा. सकाळी ती डाळ पाणी न घालता वाटून घ्या.

इथे मी मुगाची डाळ किंवा हरभऱ्याच्या डाळीचा वापर केलेला आहे त्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ न वापरता पूर्णपणे तुरीची डाळ सुद्धा वापरू शकतात.सर्वप्रथम चिवय साधारण पाच ते सहा वेळा पाण्यातून स्वच्छ धुऊन घ्या.

खूपच माती असते त्यामुळे ती पाच ते सहा वेळा धुवावी लागते. भाजी धुतल्यानंतर तिला बारीक चिरून घ्या. एक कांदा चिरून घ्या.

कोथिंबीर बारीक चिरून घ्या.मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण सोललेले त्याच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकाचा तुकडा अर्धी वाटी शोप,अर्धी वाटी धने ,अर्धी वाटी जिरे या सर्वांची बारीक अशी पेस्ट करून घ्या.

पेस्ट करताना त्यामध्ये पाणी घालायचे नाही. आता एक तगारी घ्या. चिरलेली चिवयची भाजी घ्या. त्यावर डाळीचे वाटलेले मिश्रण घाला.

त्यानंतर लसूण मिरची आले याची केलेली पेस्ट घाला. हे रवण चांगले फेटून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ घाला आणि मिश्रण पुन्हा फेटा.

मिश्रण फेटल्यानंतर साधारण एक ते दोन पोळ्या त्यामध्ये तेल घाला यामुळे फुनके मऊ असतात. आता हिरवं छानपणे फेटून घ्या.

त्यानंतर एका पितळी पातेल्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घालून पाण्याला चांगल्या उकळी येऊ द्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मंद करा.

एकाच स्टीलच्या चाळीमध्ये ब्रशच्या साह्याने तेल लावून घ्या तेल लावल्यानंतर त्यामध्ये हाताला तेल लावा आणि छोटे छोटे गोल आकाराचे किंवा लांबोळक्या आकाराचे फुनके तयार करून घ्या.

आणि ते चाळणीमध्ये गोल या पद्धतीने ठेवा. असे आठ ते दहा फुनके एका चाळणीत बसतात. हे फुनके या पद्धतीने तयार करून घ्या.

त्यानंतर तयार झालेली चाळणी साधारण वीस मिनिटे आपण जे पाणी गरम केलेले आहे त्या पातेल्यावर ठेवा आणि त्यावर झाकण ठेवा वीस मिनिटे आपण फुनके वाफवून घेऊ.

आता गॅस बंद करा गॅस बंद केल्यानंतर एका सराट्याला तेल लावून फुनके काढून घ्या. फुनके काढल्यानंतर पुन्हा चाळणीला तेल लावा

आणि बाकी मिश्रणाचे पुन्हा फुनके तयार करून ते वापरायला ठेवून द्या याप्रमाणे आपण सर्व रवणाचे फुलके तयार करून घेणार आहे.

फुनके मोडून त्यावर तुम्ही कच्चे तेल घेऊन खाऊ शकतात. तसेच या फुणक्यांची दोन तुकडे करून त्याला जिरे मोहरी फोडणी घालून कढी सोबत खाऊ शकतात.

काढल्यानंतर आता आपले फुनके खाण्यास गरमागरम तयार आहे…. कोणत्या सोबत आपण ताकाची कढी पिऊ शकतो.

ताकाच्या कडी ची रेसिपी मी शेअर केलेली आहे….. चला तर मंडळी मग गरमागरम फुनके आणि कढी एन्जॉय करूया……

टिप्स::

फुनके वाफवताना त्यावर झाकण नक्की ठेवा त्याशिवाय फुनके वाफवले जाणार नाही. फुनक्याचे रवण यामध्ये तुम्हाला आवडत असलेल्या डाळींचा तुम्ही वापर करू शकतात. मी इथे मुगाच्या आणि हरभऱ्याच्या डाळीचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही संपूर्ण तुरीच्या डाळीचा वापर करू शकतात. मुगाची डाळ ही पचायला हलकी असते म्हणून मी इथे मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे.

वेळ व परि माण::


तयारीची वेळ:२०मिनिटे
एकूण वेळ :४०मिनिटे
परिमाण :पाच व्यक्तींसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4330

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.