दही शेवपुरी

प्रस्तावना::
दही शेवपुरी हा एक चटपटीत पदार्थ आहे. सर्वांना अत्यंत आवडणारा तसेच चटपटीत आणि चवदार असा पदार्थ आहे. दही दही मुळे गोड आंबट अशी चव प्राप्त होणारा पदार्थ आहे.
साहित्य::

- एक पाणीपुरी पॅकेट,
- १ उकडलेल्या बटाटा,
- अर्धी वाटी साखर
- एक वाटी शेव
- पुदिन्याची हिरवी चटणी
- गोड आंबट चिंचेची चटणी
- तिखट
- काळे मीठ चाट मसाला
- १कांदा
- बुंदी
कृती::
सर्वप्रथम कांदा एकदम बारीक चिरून घ्या. एक बटाटा उकडून घ्या तो सोलून घ्या त्या बटाट्यामध्ये काळे मीठ आणि तिखट घाला.

आणि चांगले मिक्स करून घ्या.आता दही तयार करून घेऊ एका पातेल्यामध्ये दही घ्या त्यामध्ये साखर घालून विस्करच्या साह्याने फेटून घ्या.
तुम्ही दही आणि साखर मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेऊ शकतात. एका डिशमध्ये पाणीपुरीचे फुगे फोडून घ्या.
पाणी पाणीपुरीच्या पुरीमध्ये थोडी बुंदी घाला आता चिरलेला कांदा घाला त्यावर हिरवी पुदिन्याची चटणी एक चमचा घाला.
त्यामध्ये दही चार ते पाच चमचे घाला पुरी पूर्ण भरली जाईल इतपत घाला. त्यानंतर त्यावर चिंचेची चटणी घाला.
आता त्यावर सर्वदूर शेव घाला. त्यावर आपल्याला चाट मसाला तिखट आणि काळे मीठ घाला. आता आपली दही शेवपुरी खाण्यास तयार झालेली आहे….

यामध्ये तुम्ही खजुराच्या (चटणीचाही वापर करू शकतात मी इथे गोड आंबट चिंचेची चटणी चा वापर केलेला आहे. तसेच इथे हिरव्या पुदिन्याच्या चटणीचा वापर केलेला आहे त्या ऐवजी तुम्ही लाल तिखटाच्या चटणीचा सुद्धा वापर करू शकतो. इथे मी टोमॅटो चा वापर केला नाही आवडत असल्यास चिरलेला टोमॅटो सुद्धा तुम्ही घालू शकतात.)
टिप्स::
पुरी फोडताना चमच्याच्या मागच्या भागांनी तुम्ही पुरी फोडू शकतात त्यामुळे भुगा होणार नाही आणि पाणीपुरीची पुरी व्यवस्थित फुटेल.
वेळ व परिमाण::
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ: २० मिनिटे
परिमाण: ३व्यक्तीसाठी
