🥘 १. रेसिपीचं नाव
कोरडी चटणी
📸 २. फोटो / फीचर्ड इमेज : रेसिपीचा एक सुंदर, नैसर्गिक फोटो —

✨ ३. प्रस्तावना
थोडक्यात त्या पदार्थाबद्दल माहिती — हा खाद्य पदार्थ सर्व ऋतूत बनवतात,
📝 ४. साहित्य (Ingredients)

सात-आठ लाल मिरच्यारिसगुल्ला)
३ लसूण
१ मोठी वाटी शेंगदाणे,
मीठ
🔥 ५. कृती (Steps)
- गॅस चालू करून तवा गरम करून घ्या तव्यावर मंद आचेवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्या. रसगुल्ला मिरच्या या सुद्धा तेल घालून चांगल्या खरपूस भाजून घ्या. या आपण बिना तेलाच्या पण भाजून घेऊ शकतो जास्त तेल टाकू नये कारण चटणीला वास लागतो.
- त्यामुळे मिरच्यांचा ठसका लागत नाही. थोडे तेल टाका. गॅस बंद करा आता शेंगदाणे डिश मध्ये काढून घ्या शेंगदाण्यांचे साल काढून घ्या. आवडत असल्यास शेंगदाण्याची साल तुम्ही राहू देऊ शकतात कारण ते पौष्टिक असतात.
- आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेल्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या सर्वप्रथम मिक्सरमध्ये फिरवून घ्या त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्या.भाजलेल्या शेंगदाणे टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्या.
- चटणी जास्त बारीक करू नये ही जाडसर वाटावी यामुळे चटणीची चव अत्यंत रुचकर लागते. ही चटणी साधारण एक ते दीड महिना चांगली राहते. ही कोडी चटणी आपण प्रवासामध्ये नेऊ शकतो कारण ही एक ते दोन महिने ही चांगली राहू शकते .
- त्यामुळेच आपण त्यामध्ये मिरच्या भाजताना कमी तेलाचा वापर केलेला आहे. या चटणीवर आपण तेल घेऊन पोळी सोबत खाऊ शकतो किंवा गरम गरम कळण्याच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरी सोबत अत्यंत उत्तम लागते.
- या चटणीचा वापर आपण कोरड्या भाजीमध्ये सुद्धा करू शकतो. ही चटणी पापडावर सुद्धा चटकदार लागते कोणताही पापड भाजून त्यावर कोरडी चटणी घालून त्यावर तुम्ही तेल घालून खाऊ शकतात. लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तसेच पुरी सोबत पराठ्यांसोबत ही चटणी रुचकर लागते.
