फोडणीचा भात
प्रस्तावना: फोडणीचा भात ही साधी सरळ रेसिपी असून लहान मुलांसाठी उपयुक्त अशी आहे.
साहित्य: १ वाटी तांदूळ, १ कांदा, १ टोमॅटो, ४-५ कढीपत्ता पाने, २ लाल मिरची, कोथिंबीर,२ चिमूटभर हळद, फोडणीसाठी तूप, जिरे मोहरी, मीठ, पाणी

कृती:-
प्रथम एक वाटी तांदूळ स्वच्छ धुऊन घ्या.
कांदा आणि टमाटर चिरून घ्या.
नंतर एका पॅनमध्ये तूप घालून जिरे मोहरीची फोडणी घाला.
फोडणी घातल्यानंतर त्यात कढीपत्त्याची पाने लाल मिरची घाला.
नंतर त्यात कांदा टोमॅटो परतवा. त्यात हळद घाला. सर्व एकत्रित करा. त्यामध्ये धुतलेले तांदूळ घाला. एका वाटीला तीन वाट्या पाणी याप्रमाणे पाणी घाला. चवीप्रमाणे मीठ घाला. त्यांची झाकण बंद करून घ्या आणि दोन शिट्ट्या होऊ द्या. त्यांची वाफ निघाल्यानंतर त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घाला.
आपला फोडणीचा भात तयार आहे.

टिप्स:
फोडणीच्या भातामध्ये आपण कुठलेही मसाले घातलेले नाही कारण हा भात लहान मुलांना खावयाचा असल्यामुळे गरम मसाले घातलेले नाही.
वेळ व परिमाण:
तयारीची वेळ: १० मिनिटे
एकूण वेळ :३०मिनिटे
परिमाण: ३ मुलांसाठी
