गाजराचा हलवा

by Vaishali Chaudhari
182 views

गाजराचा हलवा


प्रस्तावना:

थंडीत गावराणी गाजर खूप मिळतात. आणि हा गरमागरम हलवा थंडीत खायची खूप मजाच वेगळी आहे. शिवाय यामध्ये असणारे काजू बदाम आणि गावराणी तुपाचा सुहास अत्यंत मनाला भावतो. चला तर बघूया आपण गाजराचा हलवा.असे गाजर खाण्यास लहान मुले तयार होत नाहीत मात्र गाजराचा हलवा आवडीने खातात. गाजर हे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. गजर हे डोळ्यांसाठी अत्यंत उपयोगी असतात.


साहित्य:

  • एक किलो गाजर,
  • दोनशे पन्नास ग्रॅम साखर
  • पंधरा ते वीस काजू
  • पंधरा ते वीस बदाम
  • पंधरा ते वीस मनुका
  • दोन चमचे तूप
  • अर्धा लिटर दूध
  • एक वाटी साय

कृती::

छान लाल गावराणी गाजर घ्यावेत. गाजर हे आकाराने मोठे घ्यावे म्हणजे खिसायला सोपे जाते.

लहान गाजर घेतल्याने त्यातला मधला भाग वाया जातो. किसायलाही जड जाते.

सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुऊन घ्या. गाजराला असणारी माती धुऊन घ्या. गाजराची साल काढून घ्या.

गजराची साल काढल्यानंतर किसणीच्या साह्याने गाजर किसून घ्या.

गाजर किसताना मधल्या पिवळसर भागाचा आपण वापर करणार नाही.

वरचा लाल कट भागच किसावा. त्यानंतर कढईमध्ये तूप गरम करावे.

तूप चांगले कडकडीत गरम झाले की मग त्यामध्ये किसलेले गाजर घालावे.

गाजर चांगले परतवून घ्यावे त्यावर झाकण ठेवावे.

दोन मिनिटे झाले की पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यावे त्यानंतर त्यामध्ये दूध घालावे आणि एक वाटी साय घालावी.

हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. दूध चांगले आटत आले की मग त्यामध्ये साखर घालावी.

साखरेचे पुन्हा पाणी होते आता हे मिश्रण चांगले 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यावे.

हे सर्व मिश्रण मंद आचेवर वाफावे. अधून मधून मिश्रण सतत हलवत राहावे.

हलवा खाली कढईला लागणार नाही याची काळजी घ्यावी. नंतर त्यामध्ये कुटलेले बदाम काजू घालावी.

तसेच किसमिस पण घालावे. आता मिश्रण पुन्हा परतून घ्यावे एक चांगली वाफ येऊ द्यावी.

आता तुमचा गरमागरम गाजराचा हलवा तयार आहे. (यामध्ये तुम्ही 250 ग्रॅम खवा घालू शकतात.

मी येथे खव्याच्या ऐवजी एक वाटी साईचा वापर केलेला आहे. खवाही घातल्यास अत्यंत उत्तम चव लागते.

शिवाय आपण अर्धा लिटर दूध वापरले आहे. तुम्हाला जास्त वाफवायची इच्छा नसल्यास तुम्ही खव्याचा वापर करू शकतात.

यामुळे हलवा झटपट तयार होतो कारण दूध आठवण्यास वेळ लागतो. मी येथे 250 ग्रॅम साखरेचा वापर केलेला आहे.

तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 400 ग्रॅम साखरेचा वापर करू शकतात.

इथे तुम्ही गुडाचाही वापर करू शकतात गुळालाही हेच प्रमाण तुम्ही वापरू शकतात ,

कारण थंडीत गूळ आरोग्याला चांगला असतो शिवाय हलव्याला गुळाचा कलरही छान येतो.)


टिप्स::

गाजराचा हलव्यामध्ये आपण मधल्या भागाचा वापर केलेला नाही त्यामुळे थोडासा चवीत फरक पडतो म्हणून त्याचा वापर करू नये. काही वेळेस गाजर किसन्याचा आपल्याला कंटाळा येतो अशा वेळेस आपण गाजर स्वच्छ धुऊन वरील साल काढून त्याचे तुकडे करून आपण कुकरमध्ये वाफवून स्मॅशर चा वापर करून ते स्मॅश करून बाकी साहित्य दूध साय काजू बदाम मनुका घालून गाजराचा हलवा बनवू शकतो.


वेळ व परिमाण::

तयारीची वेळ: ३० मिनिटे
एकूण वेळ: एक तास
परिमाण: ६ जणांसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

7507

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.