घरगुती सामानामध्ये झटपट तयार होणारा असा चिवडा
प्रस्तावना:::
उन्हाळ्यामध्ये मुलांना दुपारी छोटीशी भूक लागते.. त्यासाठी हा झटपट चिवडा आपल्याला बनवता येईल…

साहित्य::

- एक मोठी वाटी पोहे
- एक मोठी वाटी मक्याचे पोहे
- दोन मोठे वाट्या मुरमुरे
- बारीक शेव
- अर्धी वाटी डाळ्या
- आठ ते दहा कढीपत्त्याची पाने
- तळण्यासाठी तेल
- जिरे, मोहरी
- तिखट
- मीठ
- हळद
- चाट मसाला
- हिंग पावडर
कृती:::’
सर्वात आधी आपण मक्याचे पोहे तळून घेऊ… कढईमध्ये कडकडीत असे तेल गरम करा… तेल गरम झाल्यानंतर मग त्याचे मक्याचे पोहे थोडे थोडे करून तळून घ्या..

एका मोठ्या टगारीमध्ये काढा… मक्याचे पोहे तळल्यानंतर आपल्याकडे जे बटाट्याचे फ्रायम आहे ते तळून घ्यायचे आहे…
इथे तुमच्याकडे नसल्यास तरी चालेल… तुमच्याकडे बटाट्याचा वाळलेला कीस असेल तर तो तुम्ही तळून घेऊ शकता…
आता आपल्याला बटाट्याचे फ्रायम आणि मक्याच्या पोह्यांवर हळद तिखट आणि मीठ चवीप्रमाणे घालून घ्यायचे आहे…
त्यानंतर तेलामध्ये कढीपत्ता शेंगदाणे आणि डाळ्या तळून घ्यायचे आहे… हे तिने साहित्य मक्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे …

यामध्ये सुद्धा थोडे तिखट मीठ आणि हळद घालायचे आहे… आता कढईमध्ये जास्त तेल असल्यास ते काढून घेऊ…
त्यामध्ये जिरे मोहरी घाला हळद आणि तिखट घाला.आणि साधे पोहे भाजून घ्या.. साधे पोहे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.. …

साधारण मंद आचेवर चार ते पाच मिनिटे आपल्याला पोहे परतण्यासाठी लागणार आहे. . त्यानंतर हे परतलेले पोहे आपल्याला मक्याच्या पोह्यांच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे…
त्यानंतर पुन्हा कढईमध्ये थोडे तेल घालून हळद आणि तिखट मीठ घालून मुरमुरे परतून घ्यायचे आहे… आणि हे मुरमुरे मक्याचे पोह्यांच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे….
हे सर्व साहित्य घातल्यानंतर वरून चाट मसाला थोडी हिंग पावडर भुरभुरा…. त्यानंतर त्यामध्ये बारीक शेव घाला…

तुमच्याकडे बुंदी सुद्धा असली तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता…. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या…आपला कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे.
टिप्स:::
पोहे हे मंद आचेवरच परतायचे आहे.. नाहीतर ते वात ळ राहिले तर चिवडा पण नरम पडेल…
वेळ आणि परिमाण::
तयारीची वेळ :५मिनिटे
एकूण वेळ :२०मिनिटे
परिमाण::: साधारण अर्धा किलो चिवडा
