हरभऱ्याची उसळ

by Vaishali Chaudhari

हरभऱ्याची उसळ


प्रस्तावना::


हरभऱ्याची उसळ ही थंडीमध्ये खाल्ली जाणारी आणि सकाळच्या नाश्त्याचे भूक भागवणारी उसळ आहे. सकाळी ही उसळ पचनास हलकी जाते.


साहित्य::

  • पाव किलो हरभरे,
  • दोन कांदे,
  • दहा ते बारा लसूण पाकळ्या,
  • अर्धा इंच अद्रकाचा तुकडा,
  • दोन कढीपत्त्याची पाने,
  • कोथिंबीर,
  • एक चमचा तिखट,
  • पाव चमचा हळद,
  • पाव चमचा गरम मसाला,
  • मीठ ,
  • फोटोसाठी तेल,
  • अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट


कृती:

पाव किलो हरभरे रात्री एका मोठ्या पातेल्यात भिजत घालावे. दुसऱ्या दिवशी सकाळी हरभरे पुन्हा धुवून घ्यावे.

एका ओल्या रुमाला मध्ये या हरभऱ्याची गठडी बांधून घ्यावी. आणि त्यावर झाकण ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्याला मोड आलेले असतील.

मोड आलेले हरभऱ्याची उसळ अत्यंत चवदार लागते आणि पौष्टिक सुद्धा बनते. कांदा सोलून बारीक चिरून घ्यावा.

लसणाच्या पाकळ्या व अद्रकाचा तुकडा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावे. आता शेंगदाणे एका कढईमध्ये खरपूस भाजून घ्या.

भाजल्यानंतर शेंगदाण्याचे साल काढून घ्या. आता मिक्सरच्या एका भांड्यामध्ये त्याचे कूट करून घ्या.

आता एका कुकरमध्ये हरभरे घालून त्यामध्ये शिजतील तिप्पट पोळ्याचे पाणी घालावे. आणि कुकरच्या दहा ते पंधरा शिट्ट्या होईल इथपर्यंत शिजवावे.

हरभरे मऊसूत झाले पाहिजे. जेणेकरून ते पचनास सोपे होतील. हरभरे वापरताना त्याच्यामध्ये तुम्ही थोडे मीठ घालू शकतात.

यामुळे हरभऱ्याची चव चांगली लागते. काही वेळेला जुने हरभरे असल्यास ते वापरले जात नाही म्हणून काही वेळेस त्यामध्ये वाफवताना मीठ घालायचे नाही.

कढई मध्ये फोडणीस तेल घाला आता ते तेल कडकडीत गरम झाले की मग त्यामध्ये जिरे मोहरी तडतडवा.

त्यानंतर कढीपत्ता घाला त्यामध्ये चिरलेला कांदा घाला. कांदा चांगला तांबूस रंगावर परतवत आला की मग त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घाला.

ही पेस्ट आधी घातल्यास ती जास्त परतून जाईल. आता या परतलेल्या कांदा अद्रक लसणाच्या पेस्ट मिश्रणामध्ये आपण पाव चमचा हळद, एक चमचा तिखट,पाव चमचा गरम मसाला घालून व्यवस्थित मिश्रण परतवून घ्या.

ते मिश्रण लागणार नाही याची काळजी घ्या. मिश्रण चांगले परतले की त्यामध्ये आपण उकडलेले हरभरे घालावे. मिश्रण चांगले ढवळून घ्या.

हरभऱ्या सोबत वाफवले गेलेले पाणी सुद्धा थोडे घालावे. कारण हरभऱ्याची उसळ लुसलुशीत अत्यंत उत्तम लागते.

आता यावर झाकण ठेवून पाच मिनिटे चांगली वाफवून घ्या. चांगले मिश्रण व आपल्या नंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घाला.

आणि वरून चिरलेली कोथिंबीर घाला. आता यामध्ये शेंगदाण्याचे कूट घाला. शेंगदाण्याचे कूट आपण सर्वात शेवटी घालत आहोत कारण शेंगदाण्याची कूट घातल्यास उसळ एकदमच घट्ट होऊन जाईल.

चला तर मग आपली हरभऱ्याची उसळ खाण्यास तयार आहे. शेव घेऊन सर्व्ह करू शकतो . ही उसळ तुम्ही चपाती सोबत सुद्धा खाऊ शकतात. यावर तुम्ही थोडा चिवडा घेऊन हि खाऊ शकतात.नाश्त्यासाठी हा एकदम झक्कास बेत आहे.


टिप्स::

हरभरे वाफवताना त्यामध्ये पुरेसे पाणी घालावे. तसेच हरभरे जर जुने असतील तर त्यामध्ये थोडे सोडायची चिमटी घालावी. त्यामुळे हरभरे मऊ वाफवले जातील. मी येथे हरभरे वाफवताना मीठ घातलेले आहे कारण ती चव हरभऱ्यामध्ये मुरते. नाहीतर हरभरे अनवलेच लागतात .


वेळ व परिमाण::
तयारीची वेळ:३० मिनिटे
एकूण वेळ::१ तास
परिमाण:४ व्यक्तीसाठी

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

4319

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.